शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

कुशावर्त तीर्थी भरला वारकºयांचा मेळा : पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा निवृत्तिनाथांच्या चरणी लाखो भाविक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:21 IST

त्र्यंबकेश्वर : धन्य धन्य निवृत्ती देवा... काय महिमा वर्णावा.... समाधी त्र्यंबक शिखरी.... मागे शोभे ब्रम्हगिरी....

ठळक मुद्देगळ्यात तुळशीमाळा, कपाळी बुक्काआरती व अनिल ठाकरे दाम्पत्याला मानकरी

त्र्यंबकेश्वर :धन्य धन्य निवृत्ती देवा...काय महिमा वर्णावा....समाधी त्र्यंबक शिखरी....मागे शोभे ब्रम्हगिरी....दरवर्षी पौष वद्य एकादशीला त्र्यंबकेश्वरी भरणाºया यात्रेनिमित्त संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या चरणी लाखो वारकरी शुक्रवारी नतमस्तक झाले. राज्याच्या कानाकोपºयातून आलेल्या दिंड्यांनी दुमदुमलेला परिसर आज भाविकांच्या गर्दीने अधिकच फुलून गेला होता. डोक्यावर टोपी, स्वच्छ पांढरे वस्र.. गळ्यात तुळशीमाळा, कपाळी बुक्का, बुक्क्याशेजारी गोपीचंदन आणि हातातहातात टाळ, पताका घेतलेल्या लाखो वारकºयांनी त्र्यंबकनगरी गजबजून गेली आहे. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त निवृत्तिनाथ महाराज समाधीची शासकीय महापूजा आज, शुक्रवारी पहाटे राज्याचे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्नी साधना यांच्यासह केली. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सारशी येथील सौ. आरती व श्री. अनिल शंकर ठाकरे या दाम्पत्याला दर्शनाचे पहिले मानकरी होण्याचा मान मिळाला. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या त्र्यंबक नगरीत ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबक-राजाच्या सान्निध्यात व गोदातीरी आपले अवतार कार्य संपले म्हणून संजीवन समाधी घेतली. वास्तविक संत निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा ज्येष्ठ वद्य १२ या दिवशी असते. मात्र सर्वानुमते पौष वद्यला एकादशी भरते. दर्शन बारीत लांबच लांब रांगासंतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शन बारीत वारकºयांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. दर्शनासाठी प्रचंड चढाओढ सुरू होती. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात चढाओढ दिसून आली. कुशावर्तात स्नानासाठी भाविक गर्दी करीत होते. केवळ डुबकी मारून पवित्र होण्यासाठी भाविक विशेषकरून महिलावर्गाचा प्रचंड प्रतिसाद असतो. स्नानासमयी महिला आपल्या पतीच्या पायावर तसेच सासरे-सासू घरातील वडीलधाºयांच्या पायावर पाणी टाकून दर्शन घेतात. हे दृश्य कुशावर्तावर नेहमीच पहावयास मिळते. तसेच वारकरी भाविक एकमेकांना ‘जय हरी माउली’ म्हणून आलिंगन देत दर्शन घेत होते.