शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जबरी लूट : ‘अ‍ॅपल’चे शोरूम फोडून ८० आयफोन लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 16:28 IST

दालनामधील लॅपटॉप, एलईडी स्मार्ट टिव्ही, मोबाईलचे अन्य अ‍ॅसेसरीजला कुठलाही धक्का न लावता केवळ एका खोक्यात बंदिस्त ठेवलेले ८० आयफोन काही महागड्या मनगटी घड्याळे घेऊन पोबारा केला आहे

ठळक मुद्देशहरात गुन्हेगारी फोफावू लागल्याचे बोलले जात आहे.सीसीटीव्हीच्याअधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे.

नाशिक : गंगापूररोडवरील भरवस्तीतील एका सराफी दालनाच्या शेजारी असलेले अ‍ॅपल कंपनीचे अधिकृत वितरण केंद्र ‘एलिमेंट’चे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे ८० आयफोन मोबाईल बुधवारी (दि.११) पहाटे पाच वाजेच्या सुमारास लांबविल्याची धक्कादायक जबरी लूटीची घटना दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या अधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे. घटनेची माहिती मिळताच दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे लवाजम्यासह घटनास्थळी दाखल झाले.शहर व परिसरात जबरी लूटीसह सरकारी मालमत्तांना लक्ष्य करण्याबरोबरच खून, हाणामाऱ्यांसारखे प्रकार अचानकपणे वाढल्याने शांतताप्रिय शहरात पुन्हा गुन्हेगारी फोफावू लागल्याचे बोलले जात आहे. गुन्हेगारांवरील ‘खाकी’चा अंकुश अचानकपणे सैल कसा होत आहे? असा प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे. भरदिवसा रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांना शस्त्रे दाखवून लूटण्याचा प्रकार असो अथवा पुर्ववैमनस्यातून धारधार शस्त्राने खून करणे असो तसेच बंद घरे फोडून लाखो रूपयांचे दागिने हातोहात लंपास करण्याचे प्रकारही राजरोसपणे सुरू आहेत. यामुळे शहरातील कायदासुव्यवस्था धोक्यात सापडल्याचे चित्र आहे. परिणामी पोलीस यंत्रणा नाशिककरांचा ‘विश्वास’ गमावताना दिसून येत आहे.गंगापूररोडवर एलिमेंट नावाचे भव्य अ‍ॅपल कंपनीचे अधिकृत विक्री दालन आहे. या दालनाशेजारी एक ज्वेलर्स शोरूम असून या शोरूमभोवती सशस्त्र सुरक्षारक्षक २४ तास तैनात असतात. तसेच या भागात एकापेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. एलिमेेंट शोरूमला लागूनच एक रूग्णालयदेखील आहे. यामुळे रात्रीदेखील वर्दळ थोड्याफार प्रमाणात या भागात सुरूच असते. कि मान या व्यापारी संकुलात तरी एकापेक्षा अधिक सुरक्षारक्षक विविध दालनांचे रात्रपाळीवर असतात. तरीदेखील चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास धाडस करत काही मीटर उंच असलेले एलिमेंट दालनाचे इलेक्ट्रीक मोटारने उघडझाप करणारे मजबूत शटर उचकटून आत प्रवेश केला. दालनामधील लॅपटॉप, एलईडी स्मार्ट टिव्ही, मोबाईलचे अन्य अ‍ॅसेसरीजला कुठलाही धक्का न लावता केवळ एका खोक्यात बंदिस्त ठेवलेले ८० आयफोन काही महागड्या मनगटी घड्याळे घेऊन पोबारा केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरीtheftचोरी