शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत मेगा भरतीच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:18 IST

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेत मेगा भरतीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात पहिल्या टप्प्यात सध्या कंत्राटी आणि मानधनावर असलेल्यांना संधी देण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे.

नाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेत मेगा भरतीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात पहिल्या टप्प्यात सध्या कंत्राटी आणि मानधनावर असलेल्यांना संधी देण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे. त्यानंतर रिक्तपदासाठी थेट भरती राबविण्याची तयारी राजकीय स्तरावर सुरू आहे.  महापालिकेने यापूर्वी शासनाकडे आकृतिबंध सादर केला असून, त्यात अनेक रिक्तपदे दाखविण्यात आली आहेत; मात्र हा आकृतिबंध अद्याप मंजूर नाही. महापालिकेत सध्या घंटागाडी कामगार, अंगणवाडी सेविका तसेच पेस्ट कंट्रोल आणि अन्य अनेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने किंवा मानधनावर काम करीत आहेत. सध्या मानधन किंवा कंत्राटी पद्धतीने काम करणाºया सुमारे हजार कर्मचाºयांना कायम केल्यास त्याचा निवडणुकीत मोठा लाभ होईल, असे भाजपाचे गणित आहे. एक हजार पदे भरता आल्यास युवकांना रोजगार दिल्याचा दावादेखील करता येणार आहे.महापालिकेचे यापूर्वीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या अगोदर आयुक्तांनी सादर केलेल्या आकृतिबंधाविषयी प्रतिकूल मत व्यक्त केले होते. त्यामुळे भरतीच्या विचारांनाच खीळ बसली होती; मात्र आता आयुक्त बदलल्यानंतर गमे हे महापालिकेतील आणि राज्यातील सत्तारूढ पक्षाला अनुकूल निर्णय घेतील अशी भाजपाला खात्री वाटत आहे, त्यामुळेच मेगा भरतीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक