नाशिक : दिवसेंदिवस महत्त्वाच्या होत चालेल्या हवामान खात्यात वैज्ञानिक सहायक पदासाठी तब्बल ११०२ जागा भरण्यात येणार असून, त्यासाठी राज्यातील हवामान खात्यातील संघटनांनी मराठी युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वी खात्यामार्फत साडेचारशे पदांची भरती झाली होती, त्यावेळी एकही मराठी युवक निवडला गेला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर खात्यातील संघटनांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.देशात सध्या हवामान खाते महत्त्वाचे ठरले आहे. देशभरात सात प्रादेशिक हवामान केंद्राच्या अखत्यारीत एकूण आठशेवर कार्यालय आहेत. या कार्यालयांमध्येच आता ११०२ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी या आधी ४ आॅगस्ट ही आॅनलाइन अर्जासाठी अंतिम मुदत होती, मात्र आता ती वाढवून १४ आॅगस्ट अशी करण्यात आली आहे. वैज्ञानिक सहायक पदासाठी विज्ञानातील भौतिक शास्त्र पदवीधर (बीएस्सी प्रथमश्रेणी) या शैक्षणिक पात्रतेवर आधारित आहे. तथापि, यापूर्वीच्या अनुभवावरून एम एस्सी, बी. टेक. बी. ई. उमेदवार मोठ्या प्रमाणात परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.सध्या भरावयाच्या पदांसंदर्भात स्टाफ सिलेक्शनच्या एसएससी.निक या लिंकवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदरच्या पदासाठी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना आॅन जॉब ट्रेनिंग दिले जाते. हवामानविषयक उपकरणे व साधने वापरण्याचे तंत्रज्ञान दिले जाते. या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
हवामान खात्यात होणार ११०० पदांची मेगा भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:14 IST