शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी रेल्वेस्थानकात मेगाब्लॉक :  पॅसेंजर, गोदावरी एक्स्प्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:32 IST

इगतपुरी रेल्वेस्थानकात रूट रिले इंटरलॉकिंग व यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आल्याने मुंबई-भुसावळ, गोदावरी एक्स्प्रेस या दोन गाड्या रविवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत, तर भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला असून, लांब पल्ल्याच्या काही गाड्या उशिराने धावत आहे.

नाशिकरोड : इगतपुरी रेल्वेस्थानकात रूट रिले इंटरलॉकिंग व यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आल्याने मुंबई-भुसावळ, गोदावरी एक्स्प्रेस या दोन गाड्या रविवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत, तर भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला असून, लांब पल्ल्याच्या काही गाड्या उशिराने धावत आहे.  इगतपुरी रेल्वेस्थानकात रूट रिले इंटरलॉकिंग व यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आल्याने शुक्रवारी भुसावळ-मुंबई पॅसेंजर, मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. या दोन्ही गाड्या येत्या रविवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत, तर भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस शुक्रवारी भुसावळ-मनमाड-दौंडमार्गे पुण्याला रवाना झाली. रविवारपर्यंत हुतात्मा एक्स्प्रेस याच मार्गे अप-डाउन करणार आहे. हुतात्मा एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आल्याने तसेच भुसावळ-मुंबई पॅसेंजर व गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने रेल्वेप्रवासी व विशेष करून नाशिककर रेल्वे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. यामुळे शुक्रवारी लांब पल्ल्याच्या काही रेल्वे आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊन नियोजन चुकले होते.दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस शनिवारी दुपारी दोनऐवजी २.५० वाजता दादरवरून सुटणार आहे. तसेच एलटीटी-गोरखपूर, एलटीटी-दरभंगा एक्स्प्रेस, एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस, सीएसएमटी-जबलपूर गरीबरथ एक्स्प्रेस, एर्नाकुलम-हजरत निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस, लक्षद्वीप एक्स्प्रेस, एलटीटी-टाटानगर अंत्योदय एक्स्प्रेस या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने सुटणार असल्याने एक ते दोन तास उशिराने धावणार आहे.रविवारी (२१ आॅक्टोबर) एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस सकाळी १०.५५ ऐवजी एलटीटीवरून दुपारी एक वाजता सुटणार आहे. तर पाटलीपुत्र-एलटीटी एक्स्प्रेस, अलाहाबाद-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस, छापरा-एलटीटी एक्स्प्रेस, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस या गाड्या उशिरा धावतील, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वे