शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्न सुटेपर्यंत सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:11 IST

महापालिकेच्या पूर्व प्रभागातील प्रभाग क्र मांक ३० मधील कृत्रिम पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे ही कृत्रिम पाणीटंचाई जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सर्व सदस्यांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेत शुक्रवारी (दि. ५) पूर्व प्रभाग समितीच्या बैठकीत सभात्याग केला.

ठळक मुद्देपूर्व प्रभाग सभा : कृत्रिम टंचाईने सदस्य आक्रमक

इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व प्रभागातील प्रभाग क्र मांक ३० मधील कृत्रिम पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे ही कृत्रिम पाणीटंचाई जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सर्व सदस्यांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेत शुक्रवारी (दि. ५) पूर्व प्रभाग समितीच्या बैठकीत सभात्याग केला.पूर्व प्रभाग सभापती सुमन भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ५) सभा झाली. यावेळी गेल्या तीन सभेत एकही विषय विषयपत्रिकेवर न आल्याने अधिकारीवर्ग कामे करीत नसल्याचा आरोप सय्यद मुशीर यांनी केला. शहरात चिकुनगुनियासदृश, डेंग्यूसदृश आणि स्वाइन फ्लू आजारासाठी आरोग्य विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने अद्यापही नियंत्रणात नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या आजारामुळे त्रस्त झाले आहेत. औषध व धूर फवारणी फक्त ‘रोड शो’ ठरत असल्याचा आरोप सुषमा पगारे यांनी केला. सुमारे तीन महिन्यांपूर्वी लावण्यात आलेली घसरगुंडी खेळणी अर्धी तुटल्याने संबंधित विभागाने तेवढीच काढून नेली, त्यामुळे लहान बालके अद्यापही अर्धवट तुटलेल्या घसरगुंडीवर खेळत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आशा तडवी यांनी वर्तविली. प्रभाग ३० मधील अनेक ठिकाणी केरकचरा उचलला जात नाही त्यातच डेंगू सदृश्य आणि चिकन गुनिया सदृश्य आजाराचे रु ग्ण वाढत चालले आहे मग कार्यक्षम आयुक्त नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष का देत नाही? असा प्रश्न सतीश सोनवणे यांनी केला.पांडवनगरी, श्रद्धाविहार कॉलनी, एकता कॉलनी, राजीवनगर याच संपूर्ण प्रभागात गेल्या तीन वर्षांपासून कृत्रिम पाणीटंचाई पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे निर्माण होत असल्याने संतप्त झालेले प्रभागाचे नगरसेवक श्याम बडोदे, सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी या तिघांनी सभागृहात जोपर्यंत कृत्रिम पाणीटंचाईसंपत नाही, तोपर्यंत सभागृहातयेणार नाही असे म्हणत सभात्याग करीत प्रशासनाचा निषेध केला.कृत्रिम पाणीटंचाईप्रभाग क्रमांक ३० मधील कृत्रिम पाणीटंचाई गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. अनेकदा आंदोलन करूनही पाणीप्रश्न सुटत नसल्याने प्रभागाच्या तिघेही नगरसेवकांचा शुक्रवारी (दि. ५) संताप झाला. यावेळी सर्व सदस्यांनी त्यांना साथ दिली. तसेच महिला सदस्य तोंडाला मास्क लावून सभेत बसले होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater scarcityपाणी टंचाई