निफाड : ९ आॅगस्ट रोजी मुंबईत होणाºया मराठा क्र ांती मोर्चाच्या तयारीसाठी व नियोजनासाठी निफाड तालुक्यातील मराठा समाजबांधवांची महत्त्वाची बैठक शुक्र वारी (दि. ४) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात संपन्न झाली.मुंबई येथे होणाºया मराठा क्र ांती मोर्चासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त मराठा बांधवांनी उपस्थित राहावे यासाठी मोठ्या स्वरूपात जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले. रविवार, दि. ६ रोजी सकाळी ८ वाजता निफाड मार्केट कमिटी येथून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली तालुक्यातील विविध गावांतून नेण्यात येईल व क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी जनजागृती करण्यात येईल. याप्रसंगी करण गायकर, अनिल कुंदे, बाळासाहेब क्षीरसागर, चंद्रकांत बनकर, भीमराज काळे यांची भाषणे झाली. या बैठकीस करण गायकर, अनिल कुंदे, बाळासाहेब श्रीसागर, राजेंद्र डोखळे, वैकुंठ पाटील, राजेंद्र बोरगुडे, वाल्मीक कापसे, संजय कुंदे, देवदत्त कापसे, भीमराज काळे, शिवाजी मोरे, संजय गाजरे, विलास मत्सागर, दिलीप कापसे, सागर कुंदे, रितेश टर्ले, योगेश गडाख, निवृत्ती मेधणे, बापू कापसे, जयदीप कुंदे, वैभव कापसे, अमोल वडघुले, वैभव गाजरे आदी उपस्थित होते