शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मांजरपाडा प्रकरणी प्रकल्पग्रस्त, स्थानिकांची मंत्रालयात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:37 IST

मांजरपाडा वळण योजनेतील प्रकल्पग्रस्त व स्थानिकांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या सचिवांनी स्थानिकांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाझर तलाव, केटी बंधारे बांधून देण्याची तयारी दर्शविल्याने स्थानिकांनी मांजरपाडा वळण योजनेचे काम बंद आंदोलन मागे घेतले आहे. दरम्यान, आश्वासनाप्रमाणे पंधरा दिवसांत कार्यवाही न झाल्यास पुन्हा योजनेचे काम बंद पाडण्याचा इशारा पाटबंधारे विभागास देण्यात आला आहे.

दिंडोरी : मांजरपाडा वळण योजनेतील प्रकल्पग्रस्त व स्थानिकांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या सचिवांनी स्थानिकांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाझर तलाव, केटी बंधारे बांधून देण्याची तयारी दर्शविल्याने स्थानिकांनी मांजरपाडा वळण योजनेचे काम बंद आंदोलन मागे घेतले आहे. दरम्यान, आश्वासनाप्रमाणे पंधरा दिवसांत कार्यवाही न झाल्यास पुन्हा योजनेचे काम बंद पाडण्याचा इशारा पाटबंधारे विभागास देण्यात आला आहे.  ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत मांजरपाडा वळण योजनेचे काम प्रगतिपथावर असून, ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. मात्र सदर प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येत असले तरी प्रकल्पग्रस्त व बाधित असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या आठ वर्षांपासून प्रलंबित मागण्यांबाबत पाटबंधारे विभागाने कुठलीही सकारात्मक कार्यवाही केली गेली नाही. तसेच संबंधित विभागाचे अधिकारी स्थानिक आदिवासी समाजास खोटी माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण होऊन १६ एप्रिल रोजी आमदार नरहरी झिरवाळ, पंचायत समितीचे सभापती एकनाथ गायकवाड, कार्यकारी अभियंता सिंघानी यांना ग्रामस्थ व महिलांनी देवसाने येथील मारु ती मंदिरात कोंडून मांजरपाडा योजनेचे काम बंद पाडले होते. यानंतर पाटबंधारे विभागाने याबाबत गांभीर्याने दखल घेत ग्रामस्थांच्या मागण्यांबाबात कार्यवाहीसाठी प्रयत्न सुरू केले होते.  यावेळी सचिव व उपायुक्तांनी स्थानिकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत चारणवाडीसह देवसाने शिवारात तीन तलाव तसेच उनंदा नदीवर दोन केटी बंधारे बांधण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून देण्याबाबत तसेच शेतकºयांना पाणी परवानग्या मिळवून देण्याबाबत सुचना अधिकाºयांना केल्या.जलसंपदा मंत्र्याच्या उपस्थितीत चर्चाआंदोलनानंतर २१ एप्रिल रोजी आमदार नरहरी झिरवाळ, कार्यकारी अभियंता अलका आहिरराव, उपअभियंता सिंघानिया, शाखा अभियंता दराडे आदी अधिकाºयांनी वणी येथे ग्रामस्थांची बैठक घेऊन ग्रामस्थांशी मागण्यांबाबत चर्चा केली होती. मागण्यांबाबत प्रत्यक्ष कार्यवाही केल्याशिवाय काम बंद आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. यावेळी मागण्यांबाबत मंत्रालयातील जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयात आधिकाºयांच्या उपस्थित मागण्यांबाबत चर्चा झाली.

टॅग्स :DamधरणGirish Mahajanगिरीश महाजन