प्रमुख अतिथी म्हणून राज्य उपाध्यक्ष केदू देशमाने, जिल्हाध्यक्ष कांदळकर ,जिल्हा पदाधिकारी कौतिक चव्हाण, नंदू आव्हाड, बुद्धेसिंग ठोके, जिभाऊ बच्छाव व मालेगाव शिक्षक समितीचे पदाधिकारी भाऊसाहेब पवार, प्रमोद बच्छाव, सरचिटणीस पवार ,बारकू चव्हाण आदी उपस्थित होते. या सभेत तालुक्यातील प्रश्न व कामकाजाचा आढावा घेण्यात आला. कार्यकारिणीची मुदत पूर्ण झाली असून, कोरोना संसर्गामुळे अधिवेशन घेता आले नसल्याने पतसंस्थेच्या निवडणूकीनंतर अधिवेशन घेण्याचा ठराव सर्वानुमते पारीत करण्यात आला. येवला पतसंस्था निवडणूक संदर्भात बापूसाहेब बोरसे व कांदळकर यांनी मार्गदर्शन करून चर्चा घडवून आणली.याप्रसंगी तालुक्यातील सर्वच राज्य पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी संजय शेवाळे, संजय बच्छाव,अनिल धोंडगे, राजेंद्र कदम, हेमंत पवार, धोंडीराम पठाडे, संजीव पवार ,राजेंद्र काटकर, गौतम पाटील, सुरेश मोरे, आर.आर.बोरसे, सुभाष सरोदे, हंसराज बोरसे, एकनाथ पठाडे, रावसाहेब शेवाळे, शरद सोनज, बाबासाहेब नाईकवाडे, समाधान नाईकवाडे आदी उपस्थित होते.
नांदगावच्या शिक्षक समितीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:46 IST