मालेगाव : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शांततेत, पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरी करावी असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे.येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारात शांतता समिती व छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत घुगे बोलत होते. बैठकीत मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजविण्यात यावे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सुशोभीकरण व विद्युत रोषणाई करण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, रामदास बोरसे, हनीफ गुलजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रदिप अहिरे, निंबा निकम, जितेंद्र देसले आदींनी मनोगत व्यक्त केले.बैठकीला तहसिलदार चंद्रजित राजपूत, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता जे. के. भामरे, मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक पाटील, केवळ हिरे, हरिप्रसाद गुप्ता, सुनील चांगरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मालेगावी शांतता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:56 IST