शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी समन्वय समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 00:47 IST

देवळा : विकेल तेच पिकेल धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभिमान राबविण्यासंदर्भात देवळा तालुका शेतकरी समन्वय समितीची बैठक झाली. तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

कृषी व पणन विभागाच्या समन्वयाने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळावा, ठरावीक रस्त्यालगतच्या गावातील शेतकऱ्यांचा शेतीमाल, भाजीपाला विकण्याची व्यवस्था करण्यात यावी, त्यांना निवारा, छत्र्या, वजनकाटे, टेबलखुर्च्या, पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, अशा अनेक विषयांवर चर्चा घेण्यात आली. तालुक्यातील शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांचे गट आत्मा तसेच शेतकरी कंपनीद्वारे विक्रीसाठी जोडण्यात येणार आहे.तालुका स्तरावर गठित करण्यात आलेल्या शेतकरी समन्वय समिती तसेच सामाजिक व सहकारी संस्थांचे सहकार्य व मार्गदर्शन घेण्यात यावे, असे मत या प्रतिनिधींनी व्यक्त केले. याशिवाय पीकविमा, अतिवृष्टी नुकसानभरपाई, वीजपुरवठ्याची वेळ याबाबत शेतकरी प्रतिनिधींनी माहिती घेतली. तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र देशमुख, पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रशांत पवार, शेतकरी प्रतिनिधी कुबेर जाधव, विनोद देवरे, निवृत्ती देवरे, रूपेश खेडकर, भरत सावंत, बाजार समिती सचिव माणिकराव निकम यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी