शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी आज मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 01:27 IST

गेल्या अनेक वर्षांपासून शहरात निर्माण झालेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी करंजवण पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आज मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. उद्या, बुधवारी (दि. १२) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली असून, ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपाणीप्रश्न : मुंबई येथील जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात सकारात्मक चर्चा

मनमाड : गेल्या अनेक वर्षांपासून शहरात निर्माण झालेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी करंजवण पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आज मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. उद्या, बुधवारी (दि. १२) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली असून, ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.मनमाड शहरासाठीच्या करंजवण थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा योजनेवर या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. या योजनेची प्रकल्प किंमत २९७ कोटी असून, त्यासाठीचा पंधरा टक्के मार्जिन मनी मनमाड पालिका ब वर्ग असल्याने कशा पद्धतीने भरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेसमोर चौदावा वित्त आयोग, सीएसआर निधी किंवा महाराष्टÑ शासनाकडून सलवत मिळवणे असे तीन पर्याय असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या योजनेसाठी वितरण व्यवस्थेसह प्रस्ताव दाखल करण्यात यावा, अशी सूचना जलसंपदामंत्री महाजन यांनी मांडली. यावेळी शासनाचा पाटबंधारे विभाग, महाराष्टÑ जीवन प्रधिकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खासदार डॉ. भारती पवार, आमदार पंकज भुजबळ, जिल्हा परिषद सभापती मनीषा पवार, नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, उपनगराध्यक्ष राजेंद्र अहिरे, गटनेते गणेश धात्रक, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, राजाभाऊ देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, सचिन दराडे, कांतिलाल लुणावत, विनय आहेर, महेंद्र शिरसाठ, संगीता पाटील, सुरेखा मोरे यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.या सर्व बाबींवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळासमवेत बैठक आयोजित करण्यात आली असून, मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.करंजवण योजनेसाठीच्या आंदोलनानंतर बैठकीचा निर्णयमनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या करंजवण योजनेला तात्काळ मंजुरी मिळून काम सुरू व्हावे यासाठी शहरातील डॉ. अमोल गुजराथी, डॉ. सुहास जाधव, मनोज गांगुर्डे, सतीश न्हायदे, अमित बाकलीवाल यांनी आमरण उपोषण केले होते. तीन दिवस सुरू असलेल्या या आंदोलनाला शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना व जनतेने उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता. मनमाड शहरासाठीच्या करंजवण योजनेबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करावी, अशी मागणी जि.प.च्या अर्थ सभापती मनीषा पवार यांनी जलसंपदामंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे केली होती. जलसंपदामंत्री गिरीश महाजन व खासदार भारती पवार यांच्या मध्यस्तीनंतर या योजनेबाबत ११ तारखेला मंत्रालयात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई