शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 19:00 IST

मालेगाव : राज्यभरात पक्ष संघटन मजबूत करण्यात भर देण्यात येत आहे. याकरिता प्रत्येक कार्यकर्त्याने ‘नमो अ‍ॅप’ डाउनलोड करणे अत्यावश्यक आहे. बूथनिहाय पक्ष मजबूत करण्यासाठी २३ कामे निश्चित करण्यात आली आहेत. विरोधातील कार्यकर्त्यांनादेखील पक्षाशी जोडण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, तर सामान्य जनतेला आपल्या शासनाने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी कार्यकर्त्यांनीच प्रचार मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन भाजपाचे धुळे लोकसभा पक्ष विस्तारक डॉ. शशिकांत वाणी यांनी केले.

ठळक मुद्देशशिकांत वाणी : शासनाच्या कामांची व योजनांची सर्वसामान्य जनतेला माहिती द्या

मालेगाव : राज्यभरात पक्ष संघटन मजबूत करण्यात भर देण्यात येत आहे. याकरिता प्रत्येक कार्यकर्त्याने ‘नमो अ‍ॅप’ डाउनलोड करणे अत्यावश्यक आहे. बूथनिहाय पक्ष मजबूत करण्यासाठी २३ कामे निश्चित करण्यात आली आहेत. विरोधातील कार्यकर्त्यांनादेखील पक्षाशी जोडण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, तर सामान्य जनतेला आपल्या शासनाने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी कार्यकर्त्यांनीच प्रचार मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन भाजपाचे धुळे लोकसभा पक्ष विस्तारक डॉ. शशिकांत वाणी यांनी केले.भाजपाच्या मालेगाव तालुका कार्यालयात तालुक्यातील मंडल अध्यक्ष, बूथप्रमुख व पदाधिकाºयांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष दादा जाधव होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष दीपक पवार होते. याप्रसंगी डॉ. वाणी यांनी भाजपा बूथपातळीवर राबवावयाच्या अजेंड्यावर चर्चा करून मार्गदर्शन केले.वाणी म्हणाले, गेल्या वर्षी पंडित दीनदयाल जन्मशताब्दीनिमित्ताने झालेल्या कार्यविस्तार योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. यात २५४ विस्तारकांनी काम केले. यावर्षी २९४ नवीन विस्तारक सहभागी झाले आहेत. त्यामुळे बूथरचना व शक्ती केंद्ररचना हे कार्य अधिक प्रभावी करण्याची जबाबदारी आहे. कार्यकर्ते तसेच पक्ष समर्थक व सामान्य मतदारांना नमो अ‍ॅप डाउनलोड करण्यास प्रोत्साहित करावे. मंडल स्थावर मोर्चा, आघाडी पदाधिकाºयांवर प्रत्येकी पाच-पाच बूथची जबाबदारी सोपवा, सर्व बूथची वर्गवारी करा, मतदान केंद्रानुसार बैठका घ्या, ‘मन की बात’ जास्तीत जास्त लोकांना ऐकता यावी यासाठी व्यवस्था करा, खासगी, सहकारी संस्था, एनजीओ यांच्या व पदाधिकाºयांच्या संपर्कात राहा, शासन योजनांच्या लाभार्थींची यादी तयार करा, शासनाच्या योजनांचा प्रचार करा अशा सूचना डॉ. वाणी यांनी केल्या. जिल्हाध्यक्ष जाधव व तालुकाध्यक्ष पवार यांनी मार्गदर्शन केले. कमलेश निकम यांनी प्रास्ताविक केले. तालुका सरचिटणीस दीपक देसले यांनी आभार मानले. बैठकीला सुनील पाटील, सुनील शेलार, गणेश निकम, अरुण पाटील, कैलास शर्मा, अनिल निकम, राहुल बोरसे, नाना पवार, हर्षल शेवाळे, काकाजी पवार, हिंमत देवरे, राहुल पगार, निखिल अहिरे, भाऊसाहेब दासनूर आदि उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा