शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भारीप बहुजन महासंघाचा कळवणला मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 15:36 IST

तालुकाध्यक्षपदी निकम : युवा तालुकाध्यक्षपदी गरुड

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रभरात वंचित बहुजनांना एकत्र करु न सत्तास्थानापर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कळवण : सर्व समाजातील वंचितांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व शासनाकडील आपला न्याय हक्क व योजना मिळविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे यांनी भारिप बहुजन महासंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात बोलताना केले.वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रभरात वंचित बहुजनांना एकत्र करु न सत्तास्थानापर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून कळवण येथे जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे यांच्या अध्यक्षतेखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे यांनी सांगितले की, प्रत्येकाला घराबाहेर पडून जनमानसात आपली भूमिका पटवावी आहे, युवाशक्ती यासाठी खुप मोलाची ठरणार असून पक्ष मोठ्या जोमाने आपले यशस्वी प्रदर्शन येत्या काळात घडविणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. धुळे- नंदुरबार जिल्ह्याचे निरीक्षक वामनराव गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष गौतम बागुल यांचीही यावेळी भाषणे झाली. मेळाव्यामध्ये तालुकाध्यक्षपदी प्रदिप निकम, शहराध्यक्षपदी राम बस्ते आणि युवा तालुकाध्यक्षपदी नरेंद्र गरु ड, युवा शहराध्यक्षपदी विश्वामित्र बस्ते, महिला तालुकाध्यक्षपदी सौ. शोभा आहिरे यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी भिवानंद काळे, विनायक काळदाते, अरु ण गायकवाड, ढेपले, ज्येष्ठ नेते शंकरराव काकळीज, दीपचंद दोंदे, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र बच्छाव, सम्राट पगारे, युवा जिल्हा महासचिव दिलीप लिंगायत, चेतन गांगुर्डे, प्रा. अमोल बच्छाव, बिपीन पटाईत, किरण खरे, विशाल खरे, संदिप वाघ, शेखर बच्छाव, बाळा जाधव, गणेश शार्दूल यांबरोबरोबच नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर