कुमावत समाजाचा वधू-वर मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:31 PM2020-02-24T23:31:34+5:302020-02-25T00:23:05+5:30

नाशिक जिल्हा कुमावत समाज उन्नती मंडळाच्या वतीने ९ वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा नाशिक येथे पार पडला. कुमावत समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कारवाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यास व्यासपीठावर प्रादेशिक पर्यटन विकास अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, अखिल महाराष्ट्र राज्य कुमावत समाजाचे अध्यक्ष साहेबराव कुमावत, प्रदेशाध्यक्ष साहेबराव कुमावत, राजेंद्र बगडाने, प्रफुल्लचंद्र कुमावत, आमदार राहुल ढिकले, माजी उपमहापौर गुरमित बग्गा, नगरसेवक बोडके, मोहनराव शेलार, जिल्हा सचिव पंडित कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते.

Meet the bride-to-be of the Kumawat community | कुमावत समाजाचा वधू-वर मेळावा

नाशिकजिल्हा कुमावत समाज वधू-वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिमापूजन करताना शिवाजी कारवाळ. समवेत साहेबराव कुमावत, नितीन मुंडावरे, पंडित कुमावत आदी.

googlenewsNext

पाथरे : नाशिक जिल्हा कुमावत समाज उन्नती मंडळाच्या वतीने ९ वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा नाशिक येथे पार पडला.
कुमावत समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कारवाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यास व्यासपीठावर प्रादेशिक पर्यटन विकास अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, अखिल महाराष्ट्र राज्य कुमावत समाजाचे अध्यक्ष साहेबराव कुमावत, प्रदेशाध्यक्ष साहेबराव कुमावत, राजेंद्र बगडाने, प्रफुल्लचंद्र कुमावत, आमदार राहुल ढिकले, माजी उपमहापौर गुरमित बग्गा, नगरसेवक बोडके, मोहनराव शेलार, जिल्हा सचिव पंडित कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते.
देवीदास परदेशी, माजी उपमहापौर बग्गा, नितीन मुंडावरे, आमदार राहुल ढिकले, साहेबराव कुमावत, मोहन शेलार यांनी मार्गदर्शन केले. समाजबांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे. यासाठी विविध कार्यक्र म राबविण्याची आवश्यकता आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन देवीदास परदेशी यांनी केले.आभार बापूसाहेब कारवाळ यांनी मानले. यावेळी अखिल महाराष्ट्र महिला कार्याध्यक्ष भारती कुमावत, महिला प्रदेश उपाध्यक्ष उषा कुमावत, जळगाव महिला अध्यक्ष सविता कुमावत, कैलास माळवाळ, राजेंद्र बडेरे, हेमंत माळवाळ, सुभाष मामोडे, रमेश कुमावत, बापू कुमावत यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. ११ किंवा २१ जोडप्यांनी जर सामुदायिक विवाहासाठी संपर्क साधला तर अशा जोडप्यांचे विवाह थाटामाटात करून देऊ तसेच त्यांना संसारोपयोगी साहित्यही दिले जाईल, असे उन्नती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. उपस्थित समाजबांधवांना वधू-वर परिचय अर्ज वाटप करण्यात आले. यावेळी वधू-वर परिचयाचे जवळपास ४५० अर्ज भरले गेले.

Web Title: Meet the bride-to-be of the Kumawat community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न