शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

वैद्यकीय अधिकार्‍यांचे पुन्हा आंदोलन राज्यातील बारा लाख अधिकारी व कर्मचारी होणार सहभागी

By admin | Updated: May 30, 2014 01:09 IST

नाशिक : राज्यातील जवळपास ८० टक्के जनतेला आरोग्य सुविधा पुरविणार्‍या व ग्रामीण भागामध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मागण्यांकडे शासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत राज्यातील बारा हजार वैद्यकीय अधिकार्‍यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्त्यार उपसले आहे. दरम्यान, आंदोलनात इतरही आरोग्य सेवेशी संबंधित बारा लाख अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार असल्याने रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे.

नाशिक : राज्यातील जवळपास ८० टक्के जनतेला आरोग्य सुविधा पुरविणार्‍या व ग्रामीण भागामध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मागण्यांकडे शासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत राज्यातील बारा हजार वैद्यकीय अधिकार्‍यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्त्यार उपसले आहे. दरम्यान, आंदोलनात इतरही आरोग्य सेवेशी संबंधित बारा लाख अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार असल्याने रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेचे (मॅग्मो) विभागीय अध्यक्ष मोहन बच्छाव, राज्य सहसचिव डॉ. संजय पवार, जिल्हा अध्यक्ष डॉ. अरविंद माहूलकर, सचिव डॉ. युवराज देवरे, राज्य प्रतिनिधी डॉ. किरण पखरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट केली. यावेळी डॉ. बच्छाव यांनी, २०११ मध्ये जेव्हा आंदोलन पुकारण्यात आले होते, तेव्हा शासनाने तोंडी आश्वासन देऊन वैद्यकीय अधिकार्‍यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व वित्त विभागाच्या केवळ हेकेखोरपणामुळेच मागण्या प्रलंबित राहिल्या असून, येत्या ३१ मेपर्यंत सर्व मागण्यांची अंमलबजावणी करावी अन्यथा आरोग्य सेवेशी संबंधित सर्वच अधिकारी व कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा दिला. दरम्यान, ३० मेपर्यंत बा‘ व आंतररुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग, प्रसूती विभाग, एमएलसी व साथरोगविषयक कामकाज सर्व आरोग्य संस्थांतील वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी सुरू ठेवतील, तर ३१ मे रोजी राज्यातील सर्वच जिल्‘ांमध्ये सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच सर्व आरोग्य संस्थांमधील बा‘ व आंतररुग्ण विभाग, अतिदक्षता, प्रसूती विभाग व एमएलसी विभाग बंद ठेवण्यात येतील. ३१ मेपर्यंत शासनाकडून मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यास २ जूनपासून राज्यातील प्रत्येक जिल्‘ामधील सर्व आरोग्य संस्थांमधील वैद्यकीय अधिकारी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. यावेळी आरोग्य सेवेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)...तर सामूहिक राजीनामेवेळोवेळी आश्वासने देऊन संघटनेची दिशाभूल करणार्‍या शासनाने आता तरी मागण्यांचा विचार करावा; अन्यथा राज्यातील बारा हजार वैद्यकीय अधिकारी सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याचेही संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या आहेत मागण्या...- २००९-१० मध्ये सेवेत आलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना पूर्वलक्षी लाभ मिळावा.- २००६ पासून राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू करावा. - राज्यातील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांना केंद्रशासन व वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणे उच्च वेतन द्यावे. - वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांनासुद्धा ३ व ६ आगाऊ वेतनवाढीचा लाभ मिळावा.- वैद्यकीय अधिकार्‍यांचे वय ५८ वरून ६२ करावे.- एमबीबीएस व बीएएमएस वैद्यकीय अधिकार्‍यांचे खातेअंतर्गत पदोन्नतीला प्रश्न मार्गी लावावा.