शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

वनखात्यात रंगले बदल्यांचे "अर्थ"कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:24 IST

नाशिक : वनखात्यातील बदल्या अन‌् आर्थिक उलाढाल हे तसे जुनेच समीकरण. या खात्यात बदल्यांमधील ह्यअर्थह्णकारण नवीन नाही; मात्र जुलै महिन्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची वन मंत्रालयातून झालेली उचलबांगडी आणि त्यानंतर नाशिक पूर्व-पश्चिम वनविभागाच्या विविध रिक्त झालेल्या वनपरिक्षेत्रांना आतापर्यंत नवीन ह्यरेंजरह्णची करावी लागणारी प्रतीक्षा यामुळे वनविभागाच्या कार्यावर तसेच वन-वन्यजीव संरक्षणावरही गंभीर परिणाम होत आहे; मात्र बदल्यांसाठीचे सर्व अधिकार वन मंत्रालयाने स्वत:कडे राखून ठेवल्याने नियुक्तींच्या प्रतीक्षेत असलेले आणि बोलीप्रमाणे ह्यऐपतह्ण नसलेले वनपरिक्षेत्र अधिकारी मेटाकुटीला आले आहेत.

ठळक मुद्देमागणी प्रस्तावाला केराची टोपली : सहा महिन्यांपासून नाशकातील संवेदनशील वनपरिक्षेत्र रामभरोसेच

नाशिक : वनखात्यातील बदल्या अन‌् आर्थिक उलाढाल हे तसे जुनेच समीकरण. या खात्यात बदल्यांमधील ह्यअर्थह्णकारण नवीन नाही; मात्र जुलै महिन्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची वन मंत्रालयातून झालेली उचलबांगडी आणि त्यानंतर नाशिक पूर्व-पश्चिम वनविभागाच्या विविध रिक्त झालेल्या वनपरिक्षेत्रांना आतापर्यंत नवीन ह्यरेंजरह्णची करावी लागणारी प्रतीक्षा यामुळे वनविभागाच्या कार्यावर तसेच वन-वन्यजीव संरक्षणावरही गंभीर परिणाम होत आहे; मात्र बदल्यांसाठीचे सर्व अधिकार वन मंत्रालयाने स्वत:कडे राखून ठेवल्याने नियुक्तींच्या प्रतीक्षेत असलेले आणि बोलीप्रमाणे ह्यऐपतह्ण नसलेले वनपरिक्षेत्र अधिकारी मेटाकुटीला आले आहेत.सरकारी खात्यात चोरीछुप्या पध्दतीने देवाणघेवाणीमुळे वेळोवेळी खतपाणी मिळत असल्याने सरकारी व्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड अद्यापही संपुष्टात आलेली नाही. वनमंत्रालयात तर ही कीड चांगलीच फोफावलेली दिसून येत आहे. कारण, वनमंत्रालयाकडून अद्यापही रिक्त पदांवर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. नाशिक वनविभागासह राज्यातील विविध जिल्ह्यांमधील वनपरिक्षेत्र ह्यरेंजरह्णअभावी रामभरोसे आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, हरसुल, सुरगाणा, ननाशी, येवला, देवळा या सर्व वनपरिक्षेत्रांना स्वतंत्ररित्या ह्यरेंजरह्णपदाच्या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, या वनपरिक्षेत्रांमधील तत्कालीन अधिकाऱ्यांची कोरोना काळात एक जिल्हा नव्हे, तर चार ते पाच जिल्ह्यांच्या हद्दींच्या बाहेर नव्याने पदस्थापनेच्या नावाखाली बदली करण्यात आली. या बदल्यांचा ह्यखेळह्ण जुलै महिन्यात रंगविला गेला. दरम्यान, काही अधिकाऱ्यांनी नवीन बदलींची ठिकाणे त्यांच्यासाठी सोईस्कर नसल्याने त्यांनी बदलीची ठिकाणे बदलण्याची मागणीही केली. मात्र, याकडे वन मंत्रालयाकडून सर्रासपणे आजतागायत दुर्लक्ष केले जात आहे.ह्य३८ कलमीह्णने वाढविला बदल्यांचा गुंतावनमंत्री संजय राठोड यांनी राज्याच्या वनमंत्रालयाचा पदाभार स्वीकारुन नव्याचे नऊ दिवस होत नाही, तोच बदल्यांचे अधिकार हाती घेण्यासंदर्भातील ३८ कलमी पत्रक काढले. हे ३८ कलमी पत्रक म्हणजे एककलमी ह्यफर्मानह्णच ठरले आणि चर्चेचा विषय बनले. या पत्रकामुळे कोट्यवधींच्या आर्थिक उलाढालीला चांगलीच ह्यहवाह्ण मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यापासून त्यापुढील पदांच्या बदल्या मंत्रालयस्तरावरूनच नियंत्रित करण्याचे त्यांनी आदेशच काढले....ओढावली ह्यवेट ॲन्ड वॉचह्णची वेळवनमंत्रालयाकडून गेल्यावर्षी जुलै महिन्यात राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील विविध वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. दरम्यान, अंशत: बदली, विनंती बदली, पदोन्नतीसाठी वन खात्यातील आर्थिक व्यवहारांमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला ते कोंडीत सापडले आहेत. कारण ह्यतेलही गेले, तूपही गेले अन् हाती धुपाटणे आलेह्ण अशी चिंता त्यांना सतावत आहे; मात्र आर्थिक व्यवहाराची वाच्यता करणार तरी कुणाकडे म्हणून ही मंडळी ह्यवेट ॲन्ड वॉचह्ण करत आहे. ज्यांना बदलीचे ठिकाण बदलून हवे आहे, त्यांना आर्थिक उलाढाल करणाऱ्या दलालांनी तर ह्यतुमचे काम होईल, सध्याचे ठिकाण अजिबात सोडू नकाह्ण असा सल्ला देत टांगणीला ठेवले आहे....असे आहेत बदल्यांचे छुपे दरप्रादेशिक रेंज-१५ लाखांच्या पुढेसामाजिक रेंज- १० लाखांच्या पुढेवन्यजीव रेंज-१० ते १५ लाखअन्य विशेष रेंज- ७ ते ८ लाखमुदतवाढ रेंज- १२ ते १५ लाख.

टॅग्स :forest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारी