नाशिक : महापालिकेच्या चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकात काम करणाऱ्या कामगारांना वेतन न दिल्याप्रकरणी महापौर अॅड. यतिन वाघ यांनी ठेकेदारास तंबी दिली आहे. कर्मचाऱ्यांना वेतन न दिल्यास ठेकेदाराचे वेतन रोखण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.फाळके स्मारकात देखभाल दुरुस्तीच्या कामाचा ठेका दिला जातो. स्मारकावर काम करणारे ४७ कामगार कायम करण्यासाठी आधीच लढा देत आहेत. त्यातच त्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे वेतन ठेकेदार देत नसल्याने कामगारांनी काही दिवसांपासून स्मारकासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. कामगारांचे वेतन दिल्याची माहिती ठेकेदाराने महापालिकेला दिली असली तरी प्रत्यक्षात मात्र वेतन मिळाले नसल्याची श्रमिक सेवा संघाची तक्रार आहे. महापौर अॅड. वाघ यांनी कामगारांच्या आंदोलनाची दखल घेऊन ठेकेदारास तातडीने कामगारांना वेतन अदा करा अन्यथा ठेकेदाराचे वेतन रोखण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)