शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कमाल तपमान ३०.५ : नाशकात दिवसभर दाटले ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 20:56 IST

मार्च महिन्याच्या पहिला आठवडा नाशिककरांसाठी हॉट राहिला. काही दिवस तपमानाचा पारा खाली आला; मात्र पुन्हा मागील शनिवारपासून पारा चढल्याने उष्मा वाढला होता.

ठळक मुद्देढगाळ वातावरणामुळे तपमानाचा पारा घसरला.

नाशिक : मागील चार ते पाच दिवसांपासून कमाल तपमानाचा पारा ३६ अंशाच्या पुढे सरकल्याने नाशिककरांना उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत होता; मात्र गुरूवारी (दि.१५) अचानकपणे सकाळपासून वातावरणात बदला झाला. ढगाळ वातावरणामुळे तपमानाचा पारा घसरला.मार्च महिन्याच्या पहिला आठवडा नाशिककरांसाठी हॉट राहिला. काही दिवस तपमानाचा पारा खाली आला; मात्र पुन्हा मागील शनिवारपासून पारा चढल्याने उष्मा वाढला होता. गुरूवारी सकाळपासून शहरावर दाटलेले ढग संध्याकाळपर्यंत कायम राहिल्याने उन्हाच्या झळांपासून नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला. ढगाळ हवामान असूनही उष्मा फारसा जाणवला नाही, कारण वाऱ्याचा वेग चांगल्याप्रकारे दिवसभर टिकून होता. काही भागात वाºयाचा वेग मंदावल्याने नागरिकांना उकाडा सहन करावा लागला; मात्र दीर्घवेळ वाº-याचा वेग मंदावलेला राहिला नाही. त्यामुळे ढगाळ हवामानासा फारसा परिणाम नागरिकांवर झाला नाही. दाटून आलेले ढग दिवसभर कायम राहिले होते. शहराचे गुरूवारी कमाल तपमान ३०.५ अंश इतके तर किमान तपमान १९.८ अंशापर्यंत वाढले. किमान तपमानात वाढ झाल्याने वा-याचा वेगही टिकून राहिला होता.ढगाळ हवामानामुळे शेतकरी वर्गामध्ये काही प्रमाणात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अचानकपणे ढगाळ हवामान झाल्याने शेतातील गहू, द्राक्षे यांसारख्या पीकांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती शेतक-यांमध्ये व्यक्त केली जात आहे. ढगाळ हवामान पुढील काही दिवस राहू नये, अशीच शेतक-यांची अपेक्षा आहे; मात्र लहरी निसर्गापुढे सारेच हतबल असून निसर्ग आपले रंगरुप कधीही बदलत असल्याने हवामानातही तितकाच वेगाने बदल होत असल्याचा सध्या नागरिकांना अनुभव येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती