शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

‘माउली’, ‘संकल्पसिद्धी’च्या संपत्तीवर टाच; बॅँक खाती सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:49 IST

गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांना त्यांच्या परताव्याची रक्कम न देता आर्थिक फसवणूक करणाºया माउली मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी व संकल्पसिद्धी प्रॉडक्ट कंपनीच्या संपत्तीवर शहर आर्थिक गुन्हे शाखेने टाच आणली आहे. पोलिसांनी यासंदर्भात केलेल्या कारवाईत आतापर्यंत सुमारे ३ कोटी ३३ लाखांच्या दहा आलिशान कार जप्त करत २७ बॅँक खाती गोठविल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवार (दि. १५) पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देकारवाई : ३ कोटींच्या १० कार पोलिसांकडून जप्त

नाशिक : गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांना त्यांच्या परताव्याची रक्कम न देता आर्थिक फसवणूक करणाºया माउली मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी व संकल्पसिद्धी प्रॉडक्ट कंपनीच्या संपत्तीवर शहर आर्थिक गुन्हे शाखेने टाच आणली आहे. पोलिसांनी यासंदर्भात केलेल्या कारवाईत आतापर्यंत सुमारे ३ कोटी ३३ लाखांच्या दहा आलिशान कार जप्त करत २७ बॅँक खाती गोठविल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवार (दि. १५) पत्रकार परिषदेत दिली.मुंबई नाका पोलीस ठाण्यात आॅक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१९ या कालावधीत संदीप भीमराव पाटील यांनी या दोन्ही कंपन्यांचे संचालक संशयित विष्णू रामचंद्र भागवत यांच्या बोलण्यावरून सुमारे ५३ लाख ४३ हजार १२० रुपये एवढी रक्कम गुंतविली होती. गुंतविलेल्या रकमेवर त्यांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे पाटील यांनी मुंबई नाका पोलिसांकडे धाव घेऊन भागवत यांच्याविरुध्द अपहार करत फसवणुकीची फिर्याद दिली. फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्ह्णातील अपहाराची रक्कम ३ कोटी ८३ लाख ६८ हजार ३०८ रुपयांपर्यंत जाऊन पोहचली आहे.भागवत याने ठेवीदारांना विश्वासात न घेता कृषी मंत्रालयाची कुठलीही परवानगी न मिळविता उज्ज्वलम अ‍ॅग्रो मल्टिस्टेट सोसायटीतील ठेवी माउली सोसायटीत वर्ग करून घेतल्या.सात शहरांमधून कार जप्तनाशिकसह मुंबई, सोलापूर, पुणे, जळगाव, अहमदनगर आदी जिल्ह्यांत कारवाई करत दहा महागड्या गाड्या जप्त केल्या. यामध्ये रेंज रोव्हर-४, टोयाटो फोर्च्युनर-३, हुंदाई क्र ेटा-१, टोयाटो इनोव्हा-१, फोर्ड एन्डीवेअर-१ आदी कारचा समावेश आहे. भागवत व त्याचे सोसायटी, इतर कंपन्यांशी संबंधित २७ बँक खाती गोठविण्यात आली आहे. त्या खात्यांमध्ये केवळ दहा लाखांची रक्कम शिल्लक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.महागड्या कारची खरेदीसंकल्पसिध्दी फर्म व प्रॉडक्ट इंडिया कंपनीद्वारे विविध योजनांचे आमिष दाखवत लोकांकडून गुंतवणूक करून घेतली. तसेच सोसायटीच्या ठेवी गोळा करणाºया एजंटांच्या नावे कर्जही काढून रेंजरोव्हरसारख्या महागड्या कारची खरेदी त्यांनी केल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी राज्यातील विविध शहरांमध्ये पथके रवाना करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. भागवत व माउली मल्टीस्टेट सोसायटीविरोधात महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. तपास राज्य आर्थिक शाखेकडे सोपविण्याची मागणी ठेवीदारांकडून केली जात आहे.खालील वाहने केली जप्तरेंजरोव्हर (एम.एच १६ बीझेड ९९९९), रेंजरोव्हर (एम.एच ४५ एडी ९७२७), रेंजरोव्हर (एम.एच४२ एएक्स ०१००), फॉर्च्युनर (एम.एच.१२ आरएफ ००५४), फॉर्च्युनर (एम.एच१४ एचडी ८८९५) ही वाहने पुणे येथून पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच नाशिक येथून फोर्ड एन्डिवेअर (एम.एच.२० सीवाय ९९९९), फॉर्च्युनर (एम.एच ४२ एएक्स ७७२८), इनोव्हा क्रिस्टा (एम.एच १५ एफएफ ९९९९) जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच जळगाव येथून रेंजरोव्हर व ह्युंदायी क्रेटा या दोन मोटार जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांना आरटीओ क्रमांक नसून चेसीज क्रमांकाची नोंद पोलिसांकडे आहे. या सर्व वाहनांचे मालक वेगवेगळे आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी