शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मातोरीत गुंडाकडून गोळीबाराचा धाक दाखवून दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 15:02 IST

सोमवारी (दि.१५) सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर चारस्कर हे वाहनातून उतरत असताना बर्वे याने त्यांच्यावर हल्ला चढविला. स्वत:जवळील गावठी कट्टयाने भीती दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देकट्टयातून जीवंत काडतूस घटनास्थळी पडलेगावकऱ्यांनी एक काडतूस पोलिसांच्या हवाली केले

नाशिक : गाव शेतकरी, क ष्टकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. नाशिकच्या वेशीवरील मखमलाबाद जवळ असलेल्या या गावात सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टयाचा वापर करत दहशत माजविण्यासाठी हवेत गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी जीवंत काडतुस ताब्यात घेतले आहे.गोळीबार करणारा सराईत गुंड संशयित सोमनाथ बर्वे घटनास्थळावरून फरार झाला आहे.गावातील पाण्याच्या जलकुंभाजवळ महिला पिण्याचे पाणी घेण्यासाठी जातात. त्याठिकाणी बर्वे हा त्याच्या काही टवाळखोर मद्यपी साथीदारांसमवेत बसून ‘ओली पार्टी’ रंगविण्याचा प्रयत्न करत होता. त्यास गावकरी पांडुरंग चारस्कर यांनी पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभाजवळ बसण्यास विरोध केला असता बर्वे याने त्यांना शिवीगाळ करत काढता पाय घेतला. सोमवारी (दि.१५) सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर चारस्कर हे वाहनातून उतरत असताना बर्वे याने त्यांच्यावर हल्ला चढविला. स्वत:जवळील गावठी कट्टयाने भीती दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी कट्टयातून जीवंत काडतूस घटनास्थळी पडल्याने ते नागरिकांना आढळून आले. गावकऱ्यांनी एक काडतूस पोलिसांच्या हवाली केले आहे. याप्रकरणी चारस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपअधिक्षक शिवकुमार ढोले करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसFiringगोळीबार