शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

पक्षीय समीकरणात विजयाचे गणित कठीण

By admin | Updated: February 14, 2017 01:44 IST

प्रभागाची व्याप्ती मोठी : सहा आजी-माजी नगरसेवकांचे नशीब ठरणार

मनोज मालपाणी : नाशिकरोडचेहेडी सिन्नरफाटा- गोरेवाडी - चाडेगाव या प्रभाग १९ मध्ये तीनच गटांचे आरक्षण असून, प्रभागाची भौगोलिक व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे साहजिकच उमेदवारांचे मोठ पीक आले असले आहे. सहा आजी-माजी नगरसेवक नशीब अजमावत असून, मनसेचे पॅनल अपूर्ण आहे. शिवसेना, भाजपा, मनसे, आघाडी, भारतीय संग्राम परिषदेची आघाडी, इतर पक्ष व अपक्ष यामुळे विजयाचे गणित सोडविणे अवघड होऊन बसले आहे. चेहेडी, चाडेगाव गावठाण, गोरेवाडी, सिन्नरफाटा झोपडपट्टी परिसर, मळे विभाग, चेहेडी पंपिंगचा कॉलनी भाग असा संमिश्र भागांचा व लोकवस्तीचा असलेला प्रभाग १९ची व्याप्ती मोठी आहे. असे असतानाही या ठिकाणी तीनच आरक्षणे पडली आहेत.  अ-अनुसूचित गटातून शिवसेनेकडून माजी नगरसेवक संतोष साळवे, भाजपा नगरसेवक कन्हैया साळवे, राष्ट्रवादीतुन नुकतेच संभाजी ब्रिगेडवासी झालेले नगरसेवक हरिष भडांगे, मनसे - विनायक पगारे, कॉँग्रेस - संदीप काकळीज, रिपाइं आठवले गट सुनील संपत कांबळे, भारतीय संग्राम परिषद पॅनलचे संतोष वाक््चौरे, बसपा - संतोष जाधव, अपक्ष - संतोष रंजन कांबळेसह एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक उमेदवारांची आपापल्या भागातील ताकद ही त्यांची जमेची बाजू  आहे. मात्र संबंधित उमेदवार इतर भागांतून किती मतदान मिळवेल यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे.  संतोष साळवे, कन्हैया साळवे, हरिष भडांगे हे तीन आजी-माजी नगरसेवक आमने-सामने असल्याने चुरस वाढली आहे.  ब-इतर मागासवर्ग महिला गटात शिवसेना - जयश्री नितीन खर्जुल, भाजपा - नंदा वामन भोर, राष्ट्रवादीच्या नगरसेवक शोभा आवारे, भारतीय संग्राम परिषद पॅनलच्या प्राजक्ता सचिन अहेर, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या छाया सचिन गांगुर्डे हे पाच उमेदवार रिंगणात आहेत.  शिवसेनेकडून व आमदार योगेश घोलपांचे समर्थक योगेश भोर यांना उमेदवारी मिळत नसल्याने त्यांनी ऐनवेळी भाजपामध्ये प्रवेश करून आई नंदा भोर यांना उमेदवारी मिळविली, तर खासदार हेमंत गोडसे यांच्या गटाचे नितीन खर्जुल यांच्या पत्नी जयश्री खर्जुल यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. या गटात मनसेच्या अधिकृत उमेदवार महिलेने ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. या गटात सहकारी उमेदवारांकडून होणारी मदत या गटातील उमेदवारांचा विजयाचा मार्ग ठरविणार आहे. क-सर्वसाधारण गटातून शिवसेनेकडून माजी नगरसेवक अंबादास ताजनपुरे, भाजपा- पंडित आवारे, मनसे- सचिन चव्हाण, राष्ट्रवादी- विकी खेलूकर,  भारतीय संग्राम परिषदेकडून माजी नगरसेवक शिवा भागवत, कॉँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अपक्ष- किरण लोखंडे, बसपा- हनीफ शेख, एमआयएम- बापू सोनवणे व अपक्षांसह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. या गटातदेखील विभागनिहाय उमेदवारांचे प्राबल्य आहे. माजी नगरसेवक अंबादास ताजनपुरे, शिवा भागवत आमने-सामने नशीब आजमावत आहे.