शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

विद्यार्थी-पालकांना उलगडले गणिताचे कोडे

By admin | Updated: May 21, 2014 22:59 IST

प्रात्यक्षिक अन् प्रयोग : गणित सृजन कार्यशाळेचा समारोप

प्रात्यक्षिक अन् प्रयोग : गणित सृजन कार्यशाळेचा समारोपनाशिक : शाळेतील गणिताचा तास म्हटला की, वर्गातील निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांची या तासाला नकारघंटा असते. गणित म्हणजे अतिशय अवघड विषय, असा समज करून अनेक विद्यार्थ्यांना हा विषय नकोसाच वाटतो. परंतु नाशकात नुकत्याच पार पडलेल्या गणित सृजन कार्यशाळेत मात्र विद्यार्थ्यांचा हा विषय आवडता झाल्याचे दिसून आले. सदर कार्यशाळेचे आयोजन श्री ज्योती बुक सेलर्सच्या वतीने करण्यात आले होते. चारदिवसीय कार्यशाळेचा नुकताच समारोप झाला. यावेळी प्रा. हेमंत चोपडे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व प्रयोगातून गणित शिकविले. चारही दिवस वेगवेगळे विषय शिकवून नकोसा असलेला गणित विषय आवडता झाल्याची प्रतिक्रिया मुलांनी आपल्या अभिप्रायात व्यक्त केली. अशा प्रकारची कार्यशाळा नेहमीच व्हावी, अशी अपेक्षा यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनी व्यक्त केली.या चारदिवसीय कार्यशाळेत पहिल्या दिवशी त्रिमितीय वस्तूंची दुनिया, दुसर्‍या दिवशी खेळ गणितीय सूत्रांशी, तिसर्‍या दिवशी ओरिगामीतून भूमितीय संकल्पना व चौथ्या दिवशी वैदिक गणित प्रात्यक्षिकाद्वारे शिकविण्यात आले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांसह काही पालकही सहभागी झाले होते. 1- मी एक डॉक्टर आहे. पालक म्हणून मी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. कार्यशाळेतील गणित विषयाची शिकवण पाहून मला माझ्या लहानपणीच्या शाळेत बसल्यासारखे वाटले. सध्याचे शिक्षक इतक्या तन्मयतेने आणि आत्मियतेने शिकवतच नाहीत. हाडाचे शिक्षक कसे असतात, हे हल्ली आमच्या मुलांना उदाहरण देण्यासाठीसुद्धा सापडत नाहीत. अशा कार्यशाळांसाठी केवळ चार दिवस अपुरे पडतात, आणखी काही दिवस वाढवायला हवेत.- डॉ. प्रियंका येवले (पालक)२- उन्हाळी सुटी वाया जाता कामा नये. सुटीत काहीतरी वेगळे शिकायला मिळाले पाहिजे. त्या अनुषंगाने मी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. या कार्यशाळेत माझी गणिताची भीती दूर झाली. वेगवेगळ्या विषयांवर अशा कार्यशाळा व्हायला हव्यात. - खुशाल सुनील पिंगळे (विद्यार्थी)३- गणित हा विषय फार वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने शिकायला मिळाला. जे मी कधीही कोणाकडूनही शिकली नव्हती ते मला या कार्यशाळेतून शिकायला मिळाले. - मेघना अशोक औटी (विद्यार्थिनी)४- कार्यशाळेत मला जे काही शिकायला मिळाले, ते खरंच अप्रतिम होते. यापुढे पुन्हा जर अशी कार्यशाळा असेल तर मी नक्कीच सहभाग घेईन.- अनुष्का त्र्यंबक कुलकर्णी (विद्यार्थिनी)