शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

५० दिवसांत १५० महिलांवर प्रसूती शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 00:05 IST

मालेगाव मध्य : कोरोनाच्या दहशतीमुळे शहरातील सर्व खासगी रुग्णालये बंद अवस्थेत असतानाच मनपाच्या अली अकबर रुग्णालयाच्या अवघ्या दहा जणांच्या बळावर ५० दिवसांत सुमारे १५० शस्रक्रिया (सिझेरियनसह) ५०० प्रसूती केल्या. कोरोनाच्या भयामुळे दडून बसलेल्या डॉक्टरांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे.

मालेगाव मध्य : कोरोनाच्या दहशतीमुळे शहरातील सर्व खासगी रुग्णालये बंद अवस्थेत असतानाच मनपाच्या अली अकबर रुग्णालयाच्या अवघ्या दहा जणांच्या बळावर ५० दिवसांत सुमारे १५० शस्रक्रिया (सिझेरियनसह) ५०० प्रसूती केल्या. कोरोनाच्या भयामुळे दडून बसलेल्या डॉक्टरांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे.८ एप्रिल रोजी शहरात एकदम पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यापैकी एकाचा अहवाल येण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाल्याने शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. त्यानंतर शहरातील खासगी रुग्णालये बंद झाली होती. याच दरम्यान महिलांच्या प्रसूतीसाठी समोर एकमेव पर्याय होता तो अली अकबर रुग्णालय. येथे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर व १६ परिचरिकांचा स्टाफ कार्यरत होता, परंतु शहरात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता शासनाने जीवन व मन्सुरा येथे कोविड-१९ रुग्णालय तातडीने उभारण्यात आले. त्यामुळे मनपाचे वाडिया रुग्णालय पूर्णत: बंद करून येथील व कॅम्प, अली अकबर रुग्णालयातील काही आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोविड-१९ केंद्रात नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे अली अकबर रुग्णालयात १६ पैकी अवघ्या चारच परिचारिका उरल्याने येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकूण दहा जणांची टीम कार्यरत आहे, मात्र मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अली अकबर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सायका जबीन अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. तहसीन गुलाम हैदर, डॉ. अमरीन इस्हाक, डॉ. सय्यद अकबरी मोहम्मद, डॉ. सय्यद साजीद मुस्ताक, डॉ. साजीद खान व सिस्टर स्वाती पाटील, मनीषा पवार, वैशाली चव्हाण व सविता साळुंखे यांनी सकाळ, दुपार व रात्र अशा तिन्ही पाळीत नियोजनबद्ध पद्धतीने कर्तव्य बजावत एप्रिल महिन्यात ८८ सिझरसह ३४१ प्रसूती करीत ७०१ गर्भवती महिलांची तपासणी केली, तर १ ते २० मे पर्यंत ५७ सिझरसह १५१ महिलांची प्रसूती केली. ४५० गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली. संकटसमयी शहरातील गोरगरीब जनतेला मोठा आधार देत हजार कुटुंबांना मोठ्या विवंचनेतून बाहेर पडण्यात मोलाची कामगिरी बजावत त्यांनी एक आदर्श निर्माण केलाआहे.

टॅग्स :Nashikनाशिक