शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीपश्चात मातेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:12 IST

मोहाडी येथील एका गर्भवती महिलेचा प्रसूतीपश्चात काही तासांनंतर दिंडोरीरोडवरील रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१४) पहाटेच्या सुमारास घडली. यानंतर मयत विवाहितेच्या नातेवाइकांनी संतप्त होत उपचारासाठी हलगर्जीपणा करून जाणूनबुजून विलंब करणाऱ्या संशयित दोषी डॉक्टरला अटक करण्याच्या मागणीसाठी रुग्णालयात ठिय्या दिला.

नाशिक : मोहाडी येथील एका गर्भवती महिलेचा प्रसूतीपश्चात काही तासांनंतर दिंडोरीरोडवरील रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१४) पहाटेच्या सुमारास घडली. यानंतर मयत विवाहितेच्या नातेवाइकांनी संतप्त होत उपचारासाठी हलगर्जीपणा करून जाणूनबुजून विलंब करणाऱ्या संशयित दोषी डॉक्टरला अटक करण्याच्या मागणीसाठी रुग्णालयात ठिय्या दिला.मोहाडी येथील रहिवासी असलेल्या रितीका मदन ढेरिंगे (३०) यांना प्रसूतीसाठी शुक्रवारी (दि.१३) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पोकार कॉलनीतील तन्मयी रुग्णालयात दाखल केले होते. रात्री बारा वाजेच्या सुमारास ढेरिंगे यांची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. यानंतर संबंधित डॉक्टरांनी मातेची प्रकृती स्थिर असून, बाळाला मात्र बालरोग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली अन्य रुग्णालयांत दाखल करावे लागणार असल्याचे मदन ढेरिंगे यांना सांगितले. मध्यरात्री दोन वाजेनंतर रितिका यांना पोटात प्रचंड वेदना सुरू झाल्या. यामुळे त्यांच्याजवळ असलेल्या त्यांच्या आई फिर्यादी अलका चंद्रभान कळमकर (४०, रा. मोहाडी) यांनी येथील परिचारिकांच्या ही बाब लक्षात आणून दिली, मात्र ‘डॉक्टरांनी उपचाराबद्दल माहिती दिली आहे व मला फोन करू नका’ असे त्यांनी सांगितल्याचे कळमकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पहाटे सहा वाजेच्यादरम्यान कळमकर यांनी कळकळीने विनंती करत डॉक्टरांचा मोबाइल क्रमांक प्राप्त करून घेत डॉक्टरांशी संपर्क साधला. यानंतर काही वेळेत डॉक्टर रुग्णालयात पोहोचले. त्यांनी रितिकाची तपासणी करत उपचार सुरू केले. त्यानंतर सकाळी आठ वाजेच्या सुमारास अत्यवस्थेत रितिका यांना डॉक्टरांनी दुसºया रुग्णालयात हलविले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू