शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
3
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
4
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
5
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
6
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
7
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
8
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
9
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
10
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
11
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
12
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
13
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
14
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
17
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
20
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...

‘स्वच्छ सर्वेक्षण’साठी गुणांची जुळवाजुळव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 12:05 AM

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयामार्फत होणाºया स्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षेत मुख्यमंत्र्यांचे दत्तक नाशिक पहिल्या दहा क्रमांकात आणण्यासाठी महापालिकेत सध्या लगीनघाई सुरू असून, परीक्षेसाठी आवश्यक लागणाºया गुणांची जुळवाजुळव केली जात आहे. गतवर्षी परीक्षेत आढळून आलेल्या उणिवा यंदा भरून काढण्यासाठी विविध उपक्रमांवर भर दिला जात आहे.

नाशिक : केंद्रीय शहरी विकास मंत्रालयामार्फत होणाºया स्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षेत मुख्यमंत्र्यांचे दत्तक नाशिक पहिल्या दहा क्रमांकात आणण्यासाठी महापालिकेत सध्या लगीनघाई सुरू असून, परीक्षेसाठी आवश्यक लागणाºया गुणांची जुळवाजुळव केली जात आहे. गतवर्षी परीक्षेत आढळून आलेल्या उणिवा यंदा भरून काढण्यासाठी विविध उपक्रमांवर भर दिला जात आहे.  मागील वर्षी शहरी विकास मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत २००० गुणांची परीक्षा घेतली होती. त्यात ११०६ गुण प्राप्त होऊन देशातील ४३४ शहरांमध्ये नाशिक १५१व्या क्रमांकावर फेकले गेले होते. सदर परीक्षा तीन स्तरांवर घेण्यात आली होती. केंद्र सरकारचे खास पथक त्यासाठी नाशिकला येऊन गेले होते. पथकाने शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, उद्याने, खतप्रकल्प, बसस्थानके, झोपडपट्टी परिसर, भुयारी गटारी, गोदावरी नदीपात्रात होणारे प्रदूषण यांची प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली होती, शिवाय घरोघरी जाऊन नागरिकांशीही संवाद साधला होता. याशिवाय, शहरातील दहा हजार नागरिकांशी दिल्लीतून दूरध्वनी करत त्यांच्याकडून स्वच्छतेसंबंधीची मते, प्रतिसाद जाणून घेतला होता. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या स्वच्छतेबाबत ९०० गुण होते. त्यात महापालिकेला ५३७ गुण प्राप्त झाले होते, तर घरोघरी जाऊन नागरिकांशी झालेल्या संवादातून मिळालेल्या उत्तरांसाठी ५०० गुण होते. त्यात महापालिकेला २९१.०८ गुण मिळाले होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पथकाने सर्वेक्षणांतर्गत ज्या दहा हजार नागरिकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला त्यात महापालिकेला सर्वांत कमी म्हणजे ६०० पैकी २७७ गुण प्राप्त झाले होते. नागरी प्रतिसादातच महापालिकेला कमी गुण मिळाल्याने स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकला मोठा फटका बसल्याचे समोर आले होते. मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन आणि मुख्यमंत्र्यांनी स्वत: नाशिक पहिल्या दहा क्रमांकांत यावे यासाठी आग्रही भूमिका घेतल्याने महापालिकेने यंदा स्पर्धेला पूर्ण तयारीनिशी सामोरे जाण्याचे ठरविले आहे. यंदा सर्वेक्षणात चार हजार गुणांची स्पर्धा आहे. त्यात घरोघरी पथकामार्फत होणाºया पाहणीसाठी १२०० गुण तर महापालिकेने दिलेल्या सुविधा आणि नागरी प्रतिसाद यासाठी प्रत्येकी १४०० गुण आहेत. नागरी प्रतिसादांतर्गत अधिकाधिक गुण पदरात पाडून घेण्यासाठी महापालिकेने आता तयारी चालविली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता अ‍ॅप महापालिकेने तयार केले असून, ते स्मार्ट नाशिक मोबाइल अ‍ॅपशी लिंक करत डाउनलोड करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय, घनकचरा विलगीकरण, कचरा वेचकांची नियुक्ती, व्यापारी पेठांमध्ये दोनदा साफसफाई, कचºयाचे ब्लॅक स्पॉट नष्ट करणे, सफाई कर्मचाºयांची सेल्फी हजेरी, अस्वच्छता करणाºयांना जागेवरच दंड, घरपट्टी वसुलीत युजर्स चार्जेस आदींबाबत वेगवेगळे गुण असल्याने सदर गुण मिळविण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. कचरा वेचकांमार्फत जागृतीकचरा वेचकांनाही या स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी करून घेतले जाणार आहे. शहरात खतप्रकल्पासह ठिकठिकाणी सुमारे ६०० कचरा वेचक काम करतात. या कचरा वेचकांमार्फत जनजागृती केली जाणार असून, त्यांना शहरातील विविध प्रभागांसह खतप्रकल्पावर कचरा गोळा करण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यासाठी कचरा वेचकांना ओळखपत्रही महापालिकेकडून दिले जाणार आहे. शहरातील मोठ्या तारांकित हॉटेल्समधून निर्माण होणारा कचरा हा त्यांनी तेथल्या तेथेच कंपोस्ट करावा यासाठी सूचना केल्या जाणार आहेत.- डॉ. सुनील बुकाणे, आरोग्याधिकारी, मनपा