पंचवटी : दोन दिवसांपूर्वी विडी कामगारनगरजवळील पाटात बुडालेल्या दोन मुलांपैकी योगेश माहुरेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी लाखलगाव शिवारात सापडला़ दोन दिवसांपासून अग्निशमन दलाचे जवान तसेच नागरिक या दोघांचा शोध घेत होते़ दरम्यान, प्रणव खेलुकर या मुलाचा मृतदेह शोध शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुरू होता़नाशिक डावा तट कालव्याला गेल्या काही दिवसांपासून आवर्तन सोडण्यात आले आहे़ बुधवारी सायंकाळी ५वाजेच्या सुमारास विडी कामगारनगरमध्ये राहणारे प्रणव मधुकर खेलुकर (८) आणि योगेश बाळकृष्ण माहुरे (११) हे आंघोळीसाठी गेले असता पाण्यात वाहून गेले़बराच वेळ होऊनही मुले घरी न परतल्याने पालकांनी आडगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार केली होती़अग्निशमन विभाग तसेच पोलीस यंत्रणेकडून गेल्या दोन दिवसांपासून या मुलांचा शोध सुरू होता़ या दोघांपैकी योगेश बाळकृष्ण माहुरे (११) या मुलाचा मृतदेह लाखलगाव शिवारातील उखाडे यांच्या शेताजवळ पाटात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आढळून आला़ यापैकी प्रणव खेलुकर याच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे़(वार्ताहर)
पाटात वाहून गेलेल्या माहुरेचा मृतदेह सापडला
By admin | Updated: May 9, 2014 23:42 IST