शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

नऊ मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 21:12 IST

समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी करण्यासाठी अशाप्रकारचे विवाह सोहळे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनीसुध्दा विवाह अगदी साधेपणाने करण्याची शिकवण समाजाला दिली आहे, हे विसरुन चालणार नसल्याचे मोईन मियां यांनी सांगितले.

ठळक मुद्देनववधू-वरांना संसारोपयोगी भेटवस्तू युवा आदर्श संस्थेचा उपक्रम

नाशिक : शहरातील नऊ मुस्लिम जोडप्यांचा ह्यनिकाहह्ण सामूहिक पध्दतीने जुने नाशिक भागातील द्वारका येथे पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात रविवारी (दि.३१) पार पडला. युवा आदर्श मल्टीपर्पज संस्थेच्या वतीने आयोजित या सामूहिक सोहळ्यात नववधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी समाजाचे ज्येष्ठ धर्मगुरु सय्यद मोईनुद्दीन अशरफ जिलानी (मोइन मियां) उपस्थित होते.

दरवर्षी जानेवारी महिन्यात जुने नाशिक भागात युवा आदर्श या संस्थेकडून मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाहसोहळा आयोजित केला जातो. यंदाचे हे नववे वर्षे होते. रविवारी सकाळी ११ वाजता मोईन मियां यांच्या खास उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून खा. हेमंत गोडसे, आ. देवयानी फरांदे, शहर-ए- खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी, नगरसेवक समीना मेमन, सलीम शेख, मुशीर सय्यद, जेएमसीटीचे हाजी रऊफ पटेल, गुलजार कोकणी, अकरम खतीब आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी काजी हासिमोद्दीन यांनी धार्मिक पारंपरिक पध्दतीने निकाहचा विधी पार पाडला तर खतीब यांनी खास 'खुतबा' पठण केला. यावेळी ज्येष्ठ धर्मगुरु मोईन मियां यांनी दुवापठण करताना नववधू-वरांच्या भावी सौख्यभऱ्या वैवाहिक आयुष्यासाठी दुवा मागितली. तसेच समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी करण्यासाठी अशाप्रकारचे विवाह सोहळे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनीसुध्दा विवाह अगदी साधेपणाने करण्याची शिकवण समाजाला दिली आहे, हे विसरुन चालणार नसल्याचे मोईन मियां यांनी सांगितले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष बबलू शेख यांनी केले. दरम्यान, नववधू-वरांना एकसमान संसारोपयोगी भेटवस्तूही देण्यात आल्या. तसेच आलेल्या सर्व वऱ्हाडींकरिता भोजनाचीही व्यवस्था केली होती.वऱ्हाडींना सॅनिटायझर अन‌् मास्कचे वाटपसंस्थेच्या वतीने आलेल्या वऱ्हाडी मंडळींना मांडवामध्ये प्रवेश करताना सॅनिटायझर व मास्क दिले जात होते. बैठकव्यवस्थेतही अंतर राखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याचप्रमाणे थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी यावेळी रक्तदान शिबीरही घेण्यात आले. यावेळी आलेल्या वऱ्हाडी मंडळींमधून तसेच संस्थेच्या काही कार्यकर्त्यांमधून रक्तदात्यांनी रक्तदान केले. दिवसभरात सुमारे ६० ते ६५ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले.-

 

टॅग्स :NashikनाशिकMuslimमुस्लीमmarriageलग्न