जायखेडा : येथील विज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना जायखेडा ग्रामपंचायत मार्फत मास्कचे वाटप करण्यात आले. गावातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यात व गावातील विज वितरणात येणार्या अडचणी सोडवण्यात तत्पर असलेल्या विज कर्मचाºयांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी सरपंच शांताराम अहिरे, उपसरपंच संदेश मोरे, ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे, ग्रामपंचायत कर्मचारी मसूद पठाण, सचिन ब्राम्हणकार सुरेश पवार यांच्या हस्ते वीज विभागाचे कर्मचारी कालिदास सोनवणे, देविदास मोरे, प्रशांत खैरनार, प्रशांत धोंडगे, समाधान काकड, हेमंत पवार आदींना मास्क वाटप करण्यात आले.
जायखेडा वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:41 IST