वडनेर भैरव : येथील शिवारातील विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.या घटनेची माहिती मिळताच वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश गुरव व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला असूनयाबाबत वडनेर भैरव पोलीस ठाण्यात फिर्यादी लक्ष्मण गोसावी (५०, रा. गाजरावाडी ता. निफाड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि पूजा आकाश गोसावी (रा. वडनेर भैरव ता. चांदवड) हि तिच्या आई व वडील नातेवाईका ांरोबर वेळोवेळी फोनवर बोलते.यावरून चांरीत्र्यावर संशय घेऊन तिच्याकडे ते ट्रॅक्टरसाठी एक लाख रु पये माहेररुन आणावे या कारणावरून तिला मारहाण शिवीगाळ करून तिला उपाशी ठेवून छळ करत. त्यांच्या छळास कंटाळून पूजा हिने सासरी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पुजाचे पती, सासू, सासरे, दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सपोनि गणेश गुरव पोलीस उपनिरीक्षक डी. एम. गवारे व पोलीस कर्मचारी करीत आहेत.
विहिरीत उडी मारून विवाहितिची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 00:55 IST
वडनेर भैरव : येथील शिवारातील विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच ...
विहिरीत उडी मारून विवाहितिची आत्महत्या
ठळक मुद्दे वडनेर भैरव : येथील शिवारातील विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.