ओझर : ओझरच्या मनीष व मनमाड येथील वैष्णवी यांनी लॉकडाउनचे सर्व नियम पाळत तसेच अवाढव्य खर्चाला फाटा देत अवघ्या सात वºहाडींच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत विवाह बंधनात अडकले.जगाला आपल्या कवेत घेतलेल्या कोरोनाला व त्याचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने सर्वत्र लॉकडाउन आहे. त्यात मार्च, एप्रिल व मे च्या लग्न तारखा जमावबंदी आदेश असल्याने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्याच थाटाची चर्चा वधूवराच्या परिवारात सुरू असताना वधू-वराने व काही कुटुंबीय सदस्यांनी लग्नाचा निर्णय घेत अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त गाठला. साध्या पद्धतीने शेतात विवाह पार पडला. संचारबंदीचे पालन करून एक अनोखा विवाह संपन्न झाल्याचे पहायला मिळाले.वैष्णवी व मनीष यांचा विवाह १५ मे रोजी ठरला होता, परंतु दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता लॉकडाउन वाढल्याने दोन्ही कुटुंबीयांनी अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त साधून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत वधू-वरांसह वºहाडींच्या तोंडाला मास्क लावून रेशीमगाठ बांधली. यावेळी दोघांचे फक्त घरातील सदस्य, मामा-मामी व गुरु यांची उपस्थिती होती.
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 23:46 IST
ओझरच्या मनीष व मनमाड येथील वैष्णवी यांनी लॉकडाउनचे सर्व नियम पाळत तसेच अवाढव्य खर्चाला फाटा देत अवघ्या सात वºहाडींच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत विवाह बंधनात अडकले.
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत विवाह
ठळक मुद्देअक्षय्यतृतीयेचा मुहूर्त : मास्क लावून फेरे