शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

न्मेनरोड परिसरातील बाजारपेठा आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 23:26 IST

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील मेनरोड परिसरातील बाजारपेठा रविवारपासून (दि.२१) बंद ठेवण्याचा निर्णय स्वेच्छेने व्यापारी आणि हॉकर्सच्या संघटनांनी घेतला आहे. शहरात प्रथमच अशा प्रकारचा ‘जनता कर्फ्यू’च्या धर्तीवर निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देमेनरोड, शालिमार आणि जुने नाशिक भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील मेनरोड परिसरातील बाजारपेठा रविवारपासून (दि.२१) बंद ठेवण्याचा निर्णय स्वेच्छेने व्यापारी आणि हॉकर्सच्या संघटनांनी घेतला आहे. शहरात प्रथमच अशा प्रकारचा ‘जनता कर्फ्यू’च्या धर्तीवर निर्णय घेण्यात आला आहे.मेनरोड, शालिमार आणि जुने नाशिक भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळले असून, हा भाग सील करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढून धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे शनिवारी (दि.२०) यासंदर्भात माजी महापौर विनायक पांडे, यतिन वाघ व राजेंद्र बागुल यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक व्यापारी आणि विक्रेत्यांची बैठक झाली. पोलीस निरीक्षक साजन सोनवणेदेखील यावेळी उपस्थित होते. यात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी येत्या रविवारपासून (दि.२१) आठ दिवस म्हणजेच दि. २८ जूनपर्यंत बाजारपेठा स्वेच्छेने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यात सराफ बाजारासह अन्य सर्वच व्यावसायिक सहभागी होणार आहेत. दरम्यान, किराणा व्यवसाय अत्यावश्यक सेवेत येत असल्याने सोमवार ते बुधवार तीन दिवस बाजार बंद ठेवण्यात येणार आहे, असे किराणा व्यापारी असोसिएशनचे प्रफुल्ल संचेती यांनी दिली. बैठकीस नरेश पारख, अतुल मानकर, चेतन राजापूरकर, अमर सोनवणे, संदीप आहेर, सतीश धटिंगण तसेच हॉकर्स युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक