शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मनपाच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी मार्केटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:16 IST

महापालिकेच्या शाळा म्हटल्या की त्यात भौतिक सुविधा नाही की तंत्रज्ञान नाही, असा समज गेल्या काही वर्षांत खोटा ठरला असून, आयएसओ कोड मिळवणाऱ्या अनेक शाळांमध्ये प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागते.

नाशिक : महापालिकेच्या शाळा म्हटल्या की त्यात भौतिक सुविधा नाही की तंत्रज्ञान नाही, असा समज गेल्या काही वर्षांत खोटा ठरला असून, आयएसओ कोड मिळवणाऱ्या अनेक शाळांमध्ये प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागते. महापालिकेच्या शाळांचे महत्त्व नागरिकांना कळावे आणि या शाळांकडे कल वाढावा यासाठी काही शिक्षकांनी व्हिडीओ तयार केले असून, ते शाळांकडे कल वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.नाशिक महापालिकेच्या ९० शाळा असून सुमारे तीस हजार मुले आहेत. सध्या शासनाच्या धोरणानुसार सर्वच शाळा डिजिटल होत असून, महापालिकेच्या शाळेतदेखील ई लर्निंगच्या माध्यमातून शिकवले जाते. सर्व मुलांना पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके मिळतात. तसेच मुलांना गणवेशाचे दोन जोडदेखील मोफत दिले जातात. अलीकडील काळात शाळांमध्ये नव संकल्पनेच्या आविष्कारणाचे काम केले जाते आणि ज्ञानरचना वादावर आधारित शिक्षण दिले जाते. मुलांसाठी क्रीडा महोत्सव, तसेच विविध छंद जोपासण्याची संधी, रोटरॅक्टसारख्या संस्थांच्या शाखा असे सर्वच केले जात असते. महापालिकेच्या या शाळांच्या जमेच्या बाजू असून पारंपरिक दृष्टिकोन असलेल्या अनेक पालकांना त्या ज्ञात नाहीत. या पार्श्वभूमीवर शाळेतील शिक्षकांना पटसंख्या वाढविण्यासाठी या गोष्टीची माहिती करून द्यावी लागते. तीच माहिती धु्रवनगर येथील महापालिका शाळेतील शिक्षक नामदेव जानकर तसेच आनंदवली येथील महापालिका शाळा क्रमांक १८ मधील शिक्षिका सविता बोरसे यांनी आकर्र्षक व्हिडीओच्या माध्यमातून दिली जात आहे. विविध ग्रुपवर हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नागरिकांना तर त्या माध्यमातून महापालिकेच्या बदलेल्या शाळांची माहिती होत आहे.नामदेव जानकर यांनी यापूर्वी निशब्द नामक लघुपट तयार केला होता. तर सविता बोरसे यांची शहरातून युनिस्कोच्या शैक्षणिक प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. या दोघा शिक्षकांनी मोबाइलवर शूटिंग करून तसेच संगणकावरील सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे व्हिडीओ तयार केले आहेत. शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी उदय देवरे यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :municipal schoolमहापालिका शाळाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका