नाशिक : शहरातील मध्यवर्ती बाजारपेठांबरोबरच उपनगरातील नाशिक-पुणे महामार्ग परिसरात रस्त्यांच्या दुतर्फा लागलेले मोठमोठे आकाशकंदील आणि कंदिलांच्या माळांमुळे दिवाळसणाची चाहूल अनुभवायला मिळत आहे. बाजारपेठ आकाशकंदिलांच्या माळांवरील रोषणाईने फुलली असून कापडी, कागदी, वेताच्या काड्यांचे अन् प्लास्टिकच्या कागदापासून बनविलेले विविध रंगी आकाशकंदील नाशिककरांचे लक्ष वेधून घेत आहे. आनंदाचा आणि हर्षाचा दिवाळी सण अवघ्या तीन दिवसांवर आल्याने नागरिकांनी आकाशकंदील, विद्युत रोषणाईच्या माळा घेण्यासाठी बाजारात गर्दी केली. मांगल्याचे प्रतीक असलेले दिवे आणि आकाशकंदील म्हणजे दिवाळीचा अविभाज्य घटक आहे. ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यासाठी विक्रेते यावर्षीदेखील आकाशकंदिलांचे असंख्य प्रकार घेऊन दाखल झाले आहेत. नाशकातील मेनरोड, दहीपूल, कानडे मारुती लेन, शालिमार, शिवाजीरोड, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, एमजीरोड, दूधबाजार, भद्रकाली परिसर, सराफ बाजार आदि बाजारपेठांसह मोठ्या विक्रेत्यांबरोबरच लघुविक्रेते, बचत गटांनीही आकाशकंदिलांचे अनेक प्रकार विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. बाजारपेठांमध्ये यंदाही पारंपरिक कागदी चांदण्यांच्या आकाशकंदिलांचे भरपूर प्रकार आहेत. यातील चौकोनी, पंचकोनी, अष्टकोनी, चेंडूच्या आकाराच्या कंदिलांना ग्राहकांची पसंती मिळते आहे. या पारंपरिक दिव्यांवर कुंदन, टिकल्या, आरसे अशा कलाकुसरीच्या कामांमुळे कंदिलांना आधुनिक टच मिळाला आहे. त्यामुळे नवीन प्रकारांना मागणी मिळते आहे. या नव्या प्रकारांमुळे थर्माकोलच्या कंदिलांची मागणी घटल्याचे विक्र ेत्यांनी सांगितले.आकाशकंदिलांच्या प्रकारांप्रमाणे दरांमध्येही फरक आहे. अवघ्या शंभर रु पयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत किमती असल्याने प्र्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे आकाशकंदिलांची खरेदी करीत आहेत. कलाकुसरीच्या कंदिलांमध्ये इतरांच्या तुलनेत कागदी आकाशकंदिलांच्या किमती कमी असल्याने त्यांना नागरिकांची मागणी जास्त आहे. पारंपरिक आकार पण कलाकुसर जरा ट्रेंडी असलेल्या कंदिलांना अधिक पसंती आहे. (प्रतिनिधी)कंदिलांच्या माळांनाही पसंतीगल्लोगल्ली असलेल्या स्टॉलबरोबरच विविध ठिकाणी दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या प्रदर्शनांमध्येही जरा हटके आकाशकं दील उपलब्ध आहेत. क्र ोशाची फुले, वेताच्या काड्या, कुंदन, हॅण्डमेड पेपरपासून बनविलेले हे कंदील केवळ दिवाळी नव्हे तर एरवीसुद्धा घरात शोभिवंत वस्तू म्हणून वापरता येण्यासारखे आहेत. लहान आकारातील आकाशकंदिलांच्या माळांचीही ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.
आकाशकंदिलांनी सजली बाजारपेठ
By admin | Updated: October 25, 2016 01:32 IST