शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठ सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:59 IST

भाऊ-बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा सण म्हणजे रक्षांबधन. येत्या गुरुवारी (दि.१५) रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिन सोबतच येत असून, या दिवसाच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली आहे. दरवर्षी रक्षाबंधनाला शासकीय सुटी नसते, पण यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच रक्षाबंधन आल्यामुळे यावर्षी हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होण्याची चिन्हे दिसून येत आहे.

ठळक मुद्देबंधप्रेमाचे : विविध राख्या; बच्चेकंपनीसाठी खास आकर्षण

नाशिक : भाऊ-बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा सण म्हणजे रक्षांबधन. येत्या गुरुवारी (दि.१५) रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिन सोबतच येत असून, या दिवसाच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली आहे. दरवर्षी रक्षाबंधनाला शासकीय सुटी नसते, पण यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच रक्षाबंधन आल्यामुळे यावर्षी हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होण्याची चिन्हे दिसून येत आहे. त्यामुळे राखी व गिफ्ट खरेदीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये महिलांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे.यावर्षी बाजारात विविध राख्या आल्या असून, बच्चेकंपनीसाठी पण गमतीशीर राख्या बाजारात आल्या आहेत. गेल्या १५ दिवसांपासून रक्षाबंधनासाठी बाजारात राख्या उपलब्ध झाल्या होत्या. रक्षाबंधन तीन दिवसांवर आल्यामुळे आता बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी बघायला मिळत आहे. बाजारात यंदा विविध कलाकुसरीने नटलेल्या राख्या बघायला मिळत असून, स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा राखीला मोठी मागणी मिळत आहे. यावर्षी राख्यांच्या किमतीत किरकोळ प्रमाणात वाढ झाली असून, २४ रुपये डझनपासून ते ८०० रुपये डझनपर्यंत राख्या बाजारात मिळत आहे.शहरातील एम.जी. रोड, शालिमार, आर.के. या परिसरात ठिकठिकाणी राख्यांची दुकाने सजली आहेत. भावा-बहिणीसाठी कपलराखी, मोठ्यांसाठी बुलबुल राखी तसेच चांदीची मुलामा असलेल्या राख्याही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या राख्या दहा रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत मिळत आहे. तसेच स्टानेवाली राखी ४० रुपयांपासून पुढे मिळत आहे. याचप्रमाणे हाताने बनविण्यात आलेली जरदीसी राखी ५० रुपयांपासून पुढे मिळत आहे, तर भावाला व वहिनीला बांधली जाणारी लुंबा राखी यावर्र्षी ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या दिवशी एकमेकांप्रती प्रेम, भावना, आदर व्यक्त करण्याचा तसेच भावाच्या हाताला धागेबंधन बांधून त्याच्याकडून आयुष्यभराचे संरक्षणाचे वचन घेण्याचा हा दिवस असतो.लहान मुलांसाठी खास राख्यागतवर्षीपेक्षा यावर्षी लहान मुलांसाठी खास राख्या आल्या असून, यामध्ये लाइट सिनर राखी, म्युझिक राखी, तिरंगा राखी, पबजी राखी, डोरेमॅन राखी, मोटू पतलू राखी, पॅडमॅन राखी, अवेन्जर राखी, अ‍ॅँग्री बर्ड राखी, छोटा भीम, कृष्णा राखी, गणपती राखी, चांदीची राखी, रुद्राक्ष राखी यांसारख्या विविध राख्या बाजारात दिसून येत आहे.

टॅग्स :NashikनाशिकRaksha Bandhanरक्षाबंधन