शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

सजावटीच्या रेडिमेड वस्तूंनी बहरली बाजारपेठ

By admin | Updated: September 4, 2016 01:11 IST

गणरायाचे आगमन : आकर्षक प्लास्टिकची फुले, रंगीबेरंगी माळा, चक्र यांना मागणी

नाशिक : धावपळीचे जीवन आणि सण साजरे करताना एकमेकांशी लागलेली स्पर्धा यामुळे एकेकाळी स्वत: राबून तयार केली जाणारी गणेशोत्सवाची सजावट हल्ली रेडिमेड वस्तूंद्वारे केली जात आहे. यामुळे कल्पकतेने, नैसर्गिक साहित्य वापरून केलेली जीवंत सजावट हल्ली कृत्रिम वाटू लागली आहे. या कृत्रिम सजावटीलाच जास्त महत्त्व दिले जात असल्याने त्याची बाजारपेठ सध्या जोरात चलती सुरू आहे. मेनरोड, रविवार कारंजा यांसह उपनगरांतील बाजारपेठेत मखर, फुलांच्या माळा, तोरणे, चमकदार बल्ब, मोरपिसे, छत्र्या, रेडिमेड मंडप यांची रेलचेल दिसत आहे. गणेशोत्सव मंडळांकडे कार्यकर्त्यांचा ताफा असला तरीदेखील सजावटीचे साहित्य रेडिमेड आणण्यावरच भर दिला जात आहे. घरगुती आराससाठीही हाच मार्ग अवलंबला जात आहे. सध्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा बोलबाला असला तरी सजावटीच्या वस्तू खरेदी करताना त्यांचा सोयिस्कर विसर पडत असल्याचे दिसून येत आहे. शाळा, सामाजिक संस्था शाडूमातीची गणेशमूर्ती तयार करण्याचे धडे देत असली आणि आबालवृद्धांकडून आवडीने तशा मूर्ती तयार होऊन गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी विराजमान होणार असल्या तरी त्याच घरी प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीही आणल्या जात असल्याने मूळ हेतुला हरताळ फासला जात असल्याची स्थिती दिसून येत आहे. गणेशोत्सवात यंदादेखील कापड, प्लास्टिक आदि विविध प्रकारांमध्ये फुले, फ्लॉवरपॉट, फ्लॉवर स्टॅँड यांची रेलचेल दिसत आहे. दहा रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंत हे साहित्य उपलब्ध असून नावीन्यतेमुळे त्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वस्तूंच्या दरात १० टक्के भाववाढ झाली असल्याची माहिती रविवार पेठे येथील विक्रेते अर्जुन पवार यांनी दिली. आराससाठी जसे साहित्यांमध्ये वैविध्य दिसत आहे तसेच वैविध्य गणरायाच्या अलंकारांमध्येही दिसत असून सोने, चांदी, इतर धातू, खडे, आॅक्साईड आदि प्रकारांतले वैविध्यपूर्ण दागिने बाजारात दाखल झाले आहेत. सोन्याची पॉलिश असलेले खोटे दागिनेही भाव खाऊन जात आहेत. त्यात मोदक, जास्वंदीच्या फुलांची माळ, जाळीदार उपरणे, मुकुट, दुर्वांची माळ, त्रिशूळ, शंख, कर्णफुले, बाजूबंद, आरतीचे ताट, पंचधातूचा चौरंग असे असंख्य प्रकार पहायला मिळत आहेत. दरवर्षी एकेक वस्तू खरेदी करीत सेट पूर्ण करण्यावर अनेक कुटुंबीयांकडून भर दिला जात आहे. (प्रतिनिधी)