नाशिक : लोकसभा निवडणुकीची आज मतमोजणी असल्याने शहरातील मुख्य बाजारपेठांत अघोषित बंदसारखी परिस्थिती होती. दुपारपर्यंत सर्वच निकाल स्पष्ट झाल्यानंतर मात्र बाजारपेठांमध्ये गर्दी दिसू लागली. लोकसभा निवडणुकीची आज मतमोजणी होती. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता दूरचित्रवाणीवर निवडणुकीचा निकाल पाहणे पसंत केले. त्यामुळे बाजारपेठेतील दुकाने दुपारपर्यंत बंदच होती. अनेक रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. दुपारनंतर राज्यासह देशभरातील बरेचसे निकाल स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर पडणे पसंत केले. अनेक ठिकाणी नागरिकांनी जल्लोषात सहभाग घेतला. शहराच्या मुख्य बाजारपेठा असलेल्या रविवार कारंजा, मेनरोड, शालिमार चौक, पंचवटी कारंजा या शुकशुकाट असलेल्या परिसरात सायंकाळी पाचनंतर नागरिकांची गर्दी दिसून आली.
सायंकाळी बाजारात गर्दी
By admin | Updated: May 17, 2014 00:16 IST