शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

बाजार समितीचे प्रवेशद्वार पुन्हा खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 01:26 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे दक्षिण बाजूकडील आठवडाभरापूर्वी बंद केलेले प्रवेशद्वार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यापुढे बाजार समिती प्रवेशद्वाराबाहेर कोणतेही प्रकारचे अतिक्रमण होऊ देऊ नये तसेच सदरचा रस्ता केवळ शेतकºयांची वाहने ये-जा करण्यासाठी खुला ठेवावा, अशी अट घालण्यात आली आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांना तंबी : तर पुन्हा कारवाईकेवळ शेतकºयांच्या वाहनांना परवानगी

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे दक्षिण बाजूकडील आठवडाभरापूर्वी बंद केलेले प्रवेशद्वार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यापुढे बाजार समिती प्रवेशद्वाराबाहेर कोणतेही प्रकारचे अतिक्रमण होऊ देऊ नये तसेच सदरचा रस्ता केवळ शेतकºयांची वाहने ये-जा करण्यासाठी खुला ठेवावा, अशी अट घालण्यात आली आहे.यापूर्वी बाजार समितीने पेठरोडकडचे प्रवेशद्वार सुरक्षिततेच्या दृष्टीने काही वर्षांपूर्वीच बंद केले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात दक्षिण दरवाजा परिसरातील वाढते अतिक्रमण, वाहतूक कोंडी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्पुरत्या स्वरूपात प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेतला होता.प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेतल्याने व्यापाºयांनी नाराजी व्यक्त करत बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांची भेट घेतली होती. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दिंडोरीरोड आणि हॉटेल उत्तम हिरा येथून जाणारा रस्ता असे दोन रस्ते भाजीपाला वाहतुकीसाठी आहेत.पूर्वी तीन रस्ते होते त्यापैकी पेठरोडकडून बाजार समितीत येणाºया रस्त्यावर शेतकºयांचा माल चोरी होणे, शेतकºयांना दमदाटी करून रोकड चोरणे व मारहाण करून धमकी देणे असे गुन्हेगारीचे प्रकार घडायचे. सतत घडणाºया प्रकारामुळे बाजार समितीने सुरक्षितता म्हणून प्रवेशद्वार बंद करावे लागेल, अशी ठाम भूमिका घेतली होती.हॉटेल उत्तम हिरा येथून बाजार समितीत जाणाºया रस्त्यावर हॉटेल्स, चहा टपरी, बियाणे तसेच शेतीची अवजारे विक्रीची अनेक दुकाने आहेत. या दुकानांसमोर काही वर्षांपासून कांदा, बटाटा विक्रेते व अन्य व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते.या रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटवावे, अशी मागणी चुंबळे यांनी अनेकदा मनपाकडे लेखीस्वरूपात केली होती. मात्र मनपाने दखल न घेतल्याने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि अतिक्रमणावर लगाम बसावा, शेतकºयांची लूटमार होऊ नये या सुरक्षिततेच्या दृष्टीने गेल्या आठवड्यात बॅरिकेड्स टाकून सुरक्षारक्षक नेमून प्रवेशद्वार बंद केले होते.

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती