शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

जिल्हा बॅँकेनंतर बाजार समित्यांमध्ये ‘द्वंद’

By admin | Updated: June 9, 2015 01:47 IST

नाशिक, पिंपळगाव, कळवणसाठी स्पर्धा

  नाशिक : नुकत्याच आटोपलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीनंतर आता शेतकरी आणि सहकाराशी निगडित असलेल्या आणखी एका क्षेत्रात कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. जुलैमध्ये मतदान होणाऱ्या या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आडून सरळसरळ राजकारणातील उट्टे आणि विजय-पराभवाची परतफेड करण्याचे काम होईल, असे दिसते. जिल्हा बॅँकेसाठी नाशिक तालुका गटातून ऐनवेळी उमेदवारी करून महापालिका स्थायी समिती सभापतिपदापाठोपाठ शिवाजी चुंभळे यांनी जिल्हा बॅँकेचे संचालक पदही नाट्यमयरीत्या मिळविले. अर्थात जिल्हा बॅँकेवरील दीड दशकाची सत्ता भोगलेले माजी खासदार देवीदास पिंगळे जरा आत्मविश्वासातच असल्याने त्यांना फटका बसला. आता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा एकदा पिंगळे विरुद्ध चुंभळे अशीच लढत होण्याची चिन्हे आहेत. देवीदास पिंगळेंचे गेल्या दोन दशकापेक्षा जास्त काळ बाजार समितीवर वर्चस्व असून, नाशिकला त्र्यंबकेश्वर व पेठ हे तालुकेही जोडलेले असल्याने निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. शिवाजी चुंभळे यांना माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे, मुरलीधर पाटील यांची साथ मिळण्याची शक्यता आहे. तर पिंगळे यांना त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांवर मदार ठेवावी लागणार आहे. अर्थात माजी खासदार स्व. उत्तमराव ढिकले यांना मानणारा बाजार समितीतील एक वर्ग डॉ. सुनील ढिकले यांनाही पॅनलनिर्मितीसाठी गळ घालू शकतो. तसेही डॉ. सुनील ढिकले यांना नाशिक साखर कारखान्याच्या संचालकपदाचा अनुभव येथे कामी येईल. अर्थात ढिकले आणि चुंभळे एकत्र येतात, की पिंगळे ढिकलेंना जोडीला घेतात, यावरही गणिते अवलंबून आहेत. तिकडे पिंपळगाव बाजार समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आजी-माजी आमदार अनिल कदम व दिलीप बनकर समोरासमोर उभे ठाकतील. निफाड साखर कारखान्यात स्व.डॉ. वसंत पवार यांच्या सोबतीने अनिल कदम यांनी सत्ता मिळवली होती. आताही जिल्हा बॅँकेच्या संचालकपदाचा कदम-बनकर कसा वापर करतात, हेही बाजार समितीच्या निवडणुकीत दिसून येईल. तिकडे कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता राखण्यासाठी मविप्र संचालक व जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे व जिल्हा बॅँक संचालक धनंजय पवार पुन्हा एकदा प्रयत्न करीत आहेत. समोरून जे. डी. पवार, उद्धव अहेर, कौतिक पगार एकत्र येऊन पॅनल स्थापणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कळवणमध्येही बाजार समिती निवडणुकीत नाशिक, पिंपळगाव प्रमाणेच राजकीय द्वंद पाहावयास मिळू शकते.(प्रतिनिधी)