शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विवाहिता आत्महत्या; एकाला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:32 IST

सटाणा : पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मालेगाव जिल्हा अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी बागलाण तालुक्यातील बिरदावनपाडा येथील एकाला सात वर्ष सक्तमजुरी आणि २५ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली.

ठळक मुद्देमाहेरहून पैशांची मागणी करत करत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मालेगाव जिल्हा अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी बागलाण तालुक्यातील बिरदावनपाडा येथील एकाला सात वर्ष सक्तमजुरी आणि २५ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली.बिरदावनपाडा (मानूर) येथील साहेबराव पंडित गांगुर्डे याचा विवाह हतनूर येथील वसंत गवळी यांची मुलगी चंदा हिच्याशी झाला होता. चंदाला रवींद्र आणि गायत्री असे दोन अपत्यही आहेत. मात्र साहेबराव जुगार खेळण्यासाठी व मोटरसायकल घेण्यासाठी माहेरहून पैशांची मागणी करत करत होता. चंदाने त्याची मागणी पूर्ण न केल्याने तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. साहेबरावच्या जाचाला कंटाळून २६ सप्टेंबर २०१५ रोजी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून आत्महत्या केली. याप्रकरणी सटाणा पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त करणे आदी गुन्हे साहेबराव गांगुर्डे विरुद्ध दाखल करण्यात आले. सबळ पुराव्यांमुळे मालेगाव जिल्हा अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी या खटल्याचा निकाल घोषित केला. आरोपीला हुंडाबळी प्रकरणी ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १० महिने शिक्षा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याने ७ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा २५ हजार रुपये दंड व दंड भरल्यानंतर मुलांच्या नावे ५० हजारांची मुदत ठेव, अशी शिक्षा ठोठावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस