शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा पाणीप्रश्नावर भाजपा एकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 01:55 IST

नाशिकच्या पाणीप्रश्नावर महापालिकेच्या विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपाला एकाकी पाडले असून, मराठवाड्याला पाणी न देण्याबाबत येत्या मंगळवारी नाशिकमध्ये सर्व विरोधी पक्ष तसेच पाणीविषयक तज्ज्ञांना बरोबर घेऊन कायदेशीर लढा उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देविरोधी पक्षांची मंगळवारी बैठक : भाजपावर जोरदार टीका

नाशिक : नाशिकच्यापाणीप्रश्नावर महापालिकेच्या विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपाला एकाकी पाडले असून, मराठवाड्याला पाणी न देण्याबाबत येत्या मंगळवारी नाशिकमध्ये सर्व विरोधी पक्ष तसेच पाणीविषयक तज्ज्ञांना बरोबर घेऊन कायदेशीर लढा उभारण्यात येणार आहे.यासंदर्भात मनपाचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या कार्यालयात सर्व विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची बैठक झाली. त्यात मराठवाड्याला पाणी देण्यासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्णातून पाण्याची मागणी केली जात आहे. त्यास नगर जिल्ह्णातील लोकप्रतिनिधींनी कडाडून विरोध दर्शविल्याने त्याच धर्तीवर नाशिकचे पाणी पुन्हा पळवू न देण्यासाठी विरोधकांनी एकत्रित येत आंदोलन छेडण्याची तयारी सुरू केली आहे. गंगापूर धरणात आधीच पाणी साठा कमी आहे. त्यात मराठवाड्याला पाणी दिल्यास नाशिकवर पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण होऊ शकते. यामुळे २०१६ मध्ये सर्वपक्षीय नाशिककरांनी केलेल्या आंदोलनाप्रमाणेच पुन्हा एकत्र येऊन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बोरस्ते यांनी दिली. येत्या मंगळवारी पाणीविषयक तज्ज्ञांना बरोबर घेऊन वस्तुस्थिती तपासली जाणार असून, न्यायालयाच्या आडून शासन धाक दाखवत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. नाशिकच्या पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना मराठवाड्याला सिंचनासाठी का पाणी द्यायचे असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. नाशिकबाबत शासन नेहमीच टोकाचा भेदभाव करत असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले असून, नाशिकला कुणीच वाली नसल्यामुळे धरणातून पाणी पळवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे असे होऊ नये यासाठी नाशिककरांसाठी लढा उभारण्यात येणार असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पाडणार असल्यानेच सत्ताधारी पक्षातील काही लोकप्रतिनिधी पाणीविषयक नाशिककरांची बाजू घेऊन ढोंग करत असल्याचा आरोप कॉँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी केला. सत्ताधारी पक्षाचे नाशिकवर पूतना मावशीचे प्रेम आहे. औरंगाबादसह परिसरातील बिअर व मद्याच्या कारखान्यांना पाणी देण्यासाठी पाण्याची मागणी केली जात आहे. परंतु, नाशिककर तो प्रयत्न हाणून पाडतील, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिला. सत्ताधारी नाशिककरांची घोर फसवणूक करत आहे. नाशिकच्या पाण्याचा प्रश्न आहे. वस्तुस्थिती नजरेआड करून मराठवाड्याला पाणी देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मनसेचे गटनेते सलिम शेख यांनी सांगितले. पाणीप्रश्नी शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसे, भारिप, रिपाइं, भाकप, माकप, बसपा यांसह सर्व पक्ष एकत्रित लढा देणार असल्याचे सांगण्यात आले.आमदारांचा खरपूस समाचारआमदार देवयानी फरांदे यांनी मराठवाड्यास पाणी देण्यास विरोध दर्शवित सर्वपक्षीयांची मोट बांधून विरोध करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर विरोधी पक्षांनी आमदार फरांदे यांचा खरपूस समाचार घेतला. आधी तीन आमदार आणि शहर भाजपाची मोट नीट बांधा मग सर्वपक्षीयांची मोट बांधा, असा सल्ला बोरस्ते यांनी दिला. २०१६ मध्ये सर्वपक्षीय लढा देत असताना भाजपाने स्वत:ला दूर ठेवले. आता पालकमंत्री जलसंपदा खात्याचे मंत्री आहे. यामुळे त्यांनी पालकत्व निभवावे. आमदार सत्ताधारी असल्याने त्यांनी नाशिकची बाजू भक्कमपणे मांडून न्याय द्यावा. आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहे. त्यांच्यासाठी पॅकेजची घोषणा करण्याऐवजी तिथलेच पाणी पळविले जात असल्याचे बोरस्ते म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी