शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्यामधील  व्यवहार मोकळा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:19 IST

मराठी साहित्याच्या नवकथेच्या काळात सामाजिक प्रश्नांवर लिखाण करणाऱ्या साहित्यिकांपेक्षा विशिष्ट वर्तुळातील साहित्यिकांच्याच साहित्याची चर्चा घडवून आणली गेली. त्यामुळे पीडितांच्या व्यथा मांडणा-या लेखकचे साहित्य उपेक्षित राहिल्याचे सांगतानाच मराठी साहित्यातील व्यवहार मोकळा आणि चांगला घडत नसल्याचे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.

नाशिक : मराठी साहित्याच्या नवकथेच्या काळात सामाजिक प्रश्नांवर लिखाण करणाऱ्या साहित्यिकांपेक्षा विशिष्ट वर्तुळातील साहित्यिकांच्याच साहित्याची चर्चा घडवून आणली गेली. त्यामुळे पीडितांच्या व्यथा मांडणा-या लेखकचे साहित्य उपेक्षित राहिल्याचे सांगतानाच मराठी साहित्यातील व्यवहार मोकळा आणि चांगला घडत नसल्याचे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.  कुसुमाग्रज स्मारकात संवाद संस्थेच्या ३८व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर चैत्र संवाद पुरस्कार, नीलवसंत संवाद पुरस्कार वितरणासह ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संवाद संस्थेचे अभिमन्यू सूर्यवंशी, बाळासाहेब गुंजाळ, चंद्रकांत महामिने, ज्येष्ठ पत्रकार दत्ता सराफ, संतोष हुदलीकर, चैत्रा हुदलीकर आदी उपस्थित होते. डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणाले, मराठी विश्वात सत्यशोधक साहित्याची मोठी परंपरा लाभली आहे. अभिरुची जपणारे धाडसी लेखकांची सध्या फारशी दखल घेतली जात नाही. ज्या साहित्यिकांनी जनमाणसाची जडणघडण केली आहे, अशा साहित्यिकांचा नव्याने लिहिणाºयांनी शोध घ्यायला हवा. साहित्य  क्षेत्रातही भक्तवर्गाचा उदय होत असल्याने सामाजाची व्यथा  मांडणारे साहित्य उपेक्षित राहते. साहित्यात चिकित्सेला, समीक्षेला महत्त्व असते. परंतु मराठी  साहित्यात एका वर्गातील साहित्यिकांचा भक्तवर्ग वाढत पीडितांचे वंचितांचे जीवन मांडणारे महात्मा फुले यांच्यासह ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई यांच्यासारखे साहित्यिक उपेक्षित राहिल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी धाडसी व निर्भयपणे काम करणारे संपादक होते. परंतु, आता मीडिया भयावह स्थितीतून मार्गक्रमण करीत असल्याचे सांगतानाच माध्यमे ठराविक  लोकांच्या हाती एकवटत चालल्याने समाजाचे दु:ख त्यातून उमटताना दिसत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन सुरेखा बो-हाडे यांनी केले, आभार डॉ. किरण पिंगळे यांनी मानले.महामिने, सराफ यांचा सत्कारलेखक अशोक जाधव यांच्या ‘भंगार’ या आत्मकथेला व कवी रावसाहेब कुवर यांच्या ‘हरवल्या आवाजाची फिर्याद’ या कविता संग्रहास चैत्रसंवाद पुरस्कार डॉ. श्रीकांत नरुले यांच्या ‘जगदीश खेबूडकरांच्या लावण्या’ या समीक्षेला नीलवसंत संवाद पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पत्रकार दत्ता सराफ व चंद्रकांत महामिने यांचा सन्मानपत्र देऊन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक