मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 11:05 PM2020-02-13T23:05:22+5:302020-02-14T00:46:25+5:30

दैनंदिन व्यवहारात मराठी शब्दांचा जाणीवपूर्वक वापर करावा. त्यामुळे मराठी भाषा ही समृद्ध आणि संवर्धन होईल, असे आवाहन येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले आहे.

Marathi Language Promotion fortnightly | मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

सटाणा न्यायालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना दिलीप धोंडगे़ समवेत व्ही. ए. आव्हाड, ए. जी. तांबोळी, पंडितराव भदाणे आदी़

googlenewsNext

सटाणा : दैनंदिन व्यवहारात मराठी शब्दांचा जाणीवपूर्वक वापर करावा. त्यामुळे मराठी भाषा ही समृद्ध आणि संवर्धन होईल, असे आवाहन येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये येथील तालुका विधि सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.१०) मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवारात दुपारी मराठी भाषेचा न्यायालयीन व दैनंदिन कामकाजात जास्तीत जास्त वापर या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी येथील दिवाणी न्यायाधीश व्ही. ए. आव्हाड व सहदिवाणी ए. जी. तांबोळी, वकील बार फेडरेशन नाशिक जिल्हाध्यक्ष पंडितराव भदाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यक्र माचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे म्हणाले, न्यायालयातील वकील व कर्मचारी यांनी जाणीवपूर्वक इतर क्षेत्रातील शब्द कामकाजात वापरावे तसेच आम्हीदेखील न्यायालयीन शब्द आमच्या दैनंदिन व्यवहारात वापरू यामुळे भाषा ही समृद्ध होईल, तिचा वापर सर्वसामान्य जनतेला स्वत:साठी व समजण्यासाठी नक्कीच मदत होईल. याप्रसंगी न्यायालयीन कर्मचारी तसेच सटाणा वकील संघाचे अ‍ॅड. नाना भामरे, अभिमन्यू पाटील, रवींद्र पाटील, नितीन चंद्रात्रे, सरोज चंद्रात्रे, मनीषा ठाकूर, किरण देवरे, रेखा शिंदे, सुजाता पाठक, अविनाश मोरे, सोमदत्त मुंजवाडकर, संजय आहिरे, दिलीप शहा, विष्णू सोनवणे, एस. आर. सोनवणे, आर. एम. जाधव, बी. जी. क्षीरसागर, यशवंत पाटील, नीलेश डांगरे, मयूर कोठावदे, एस. एस. शिंदे आदी वकील उपस्थित होते.

Web Title: Marathi Language Promotion fortnightly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.