शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मराठी भाषा दिन : कुसुमाग्रजांना अभिवादन; विविध सांस्कृतिक कार्यक्रम माझ्या मराठीची बोलु कौतुके ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 1:58 AM

नाशिक : मराठी भाषा दिनानिमित्त शहरातील विविध शाळा- महाविद्यालयांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देकविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पणप्रतिमेस वंदन करून अभिवादन

नाशिक : मराठी भाषा दिनानिमित्त शहरातील विविध शाळा- महाविद्यालयांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय, गंगापूररोड येथे मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी नीता बुरकुले होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक देवराम डामरे, पर्यवेक्षक नितीन देवरे, सुजाता पवार उपस्थित होते. याप्रसंगी काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. यात निकिता रनबावले, निकिता ढगे, गायत्री गायकवाड, जयनेद्र कळसकर, साक्षी चोपडे आदींनी सुंदर काव्य वाचन केले. विजेत्यांना क्रांती देवरे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. यावेळी जयवंत बोढारे, नरेंद्र पाटील, कुणाल गोराणकर, संजय अहिरे, प्रमोद पाटील, विठ्ठल व्याळीज, सुनील चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन मनीषा गांगुर्डे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनील अहिरे यांनी केले.रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष करुणासागर पगारे, मुख्याध्यापक जोशी यांच्या हस्ते कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी मराठी भाषेवर आधारित भाषणे, कविता सादर केल्या. यावेळी विद्यार्थिनींनी शुद्ध भाषा बोलण्याचा, भाषेचे संवर्धन करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमास जोपूळकर, जाधव, श्रीमती पवार आदी उपस्थित होते.साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्हाइट रोझ शाळेत मराठी भाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या स्मारकाला भेट देऊन कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस वंदन करून अभिवादन केले. यावेळी अंजली रत्नपारखी, मानसी जोशी, शोभा भामरे, योगेश रोकडे, मुख्याध्यापक प्रिती संधान, पद्मजा पाटील, जयश्री तांबे, वासंती शिंदे उपस्थित होते. पुरु षोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन शाळा समितीचे अध्यक्ष जयंत मोंढे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राज्य शासन प्रयत्न करत आहे. प्रत्येक प्रांतातील लोकांना त्यांच्या मातृभाषेचा अभिमान असतो. त्यामुळे आपणही आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक प्र. ला. ठोके यांनी मराठी भाषेचे महत्त्व व मराठी भाषेचे आपल्या जीवनातील असलेले स्थान याबद्दल माहिती दिली. शाळेचे विद्यार्थी आर्यन पोपळघट व ओम करलकर, प्रथमेश कुलकर्णी यांनी मराठी भाषेविषयी मनोगत व्यक्त केले. शाळेतील शिक्षिका संयुक्ता कुलकर्णी यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगणारी कविता सादर केली. या आठवड्यात ग्रंथ सप्ताहनिमित्त निवडक विद्यार्थ्यांनी भारत भारती प्रकाशनच्या शंभर पुस्तकांचे वाचन करून त्यावर प्रतिक्रि यांचे हस्तलिखित तयार केले. यासाठी सुरेखा म्हसकर यांचे व नववीच्या विद्यार्थ्यांनी विश्वकोश, शब्दकोश, सांस्कृतिक कोश यावर तयार केलेल्या हस्तलिखिताच्या उपक्रमास शारदा थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन रु पाली झोडगेकर यांनी, तर आभार ग्रंथपाल विलास सोनार यांनी मानले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. मराठी राजभाषा दिन व स्वामी विवेकानंद सोसायटीच्या संस्थापक कै. सीता लेले यांच्या स्मृतिसप्ताहाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद सोसायटीच्या वतीने महाराष्ट्राची लोककला या कार्यक्र माचे आयोजन कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव सुभाष पवार, रमेश मते, रत्नाकर वेळीस, वृंदा पाराशरे, कालिंदी कुलकर्णी, दीपा पांडुर्लीकर, अशुमती टोनपे, वृंदा जोशी, मुख्याध्यापक कल्पना बोरसे आदी उपस्थित होते. अलका चंद्रात्रे यांनी मदर लेले यांच्या जीवनकार्याचा माहितीपट रसिक श्रोत्यांसमोर उलगडून दाखवला, तर नमिता जानोरकर यांनी कविता सादर केली. यावेळी ज्ञानपीठ विजेते कवी कुसुमाग्रज यांचा जीवन परिचय सूचिता भोरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन योगेश कड, शुभदा टकले यांनी केले. यानंतर गायिका कार्तिकी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड यांच्या गोड स्वरांनी व कलावंतांच्या नृत्याविष्काराने सण, उत्सवांची भरभरून मेजवानी रसिक श्रोत्यांना मिळाली. सोहळ्यास संस्थेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.