शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मित्र, शिव-जिजाऊ पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 01:21 IST

छावा ही सर्व जातीधर्मांना सामावून घेणारी संघटना आहे; परंतु या संघटनेबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत. नाशिकमध्ये मराठा आरक्षणाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. परंतु आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची यापुढील काळात गय केली जाणार नाही, असे परखड मत छावा संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी व्यक्त केले.

सिडको : छावा ही सर्व जातीधर्मांना सामावून घेणारी संघटना आहे; परंतु या संघटनेबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत. नाशिकमध्येमराठा आरक्षणाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. परंतु आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची यापुढील काळात गय केली जाणार नाही, असे परखड मत छावा संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी व्यक्त केले. मराठा समाजाच्या आरक्षणाला खरा विरोध नाशिकमधून भुजबळ यांनी केला होता. यामुळे यापुढील काळात भुजबळांना संघटना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचा इशारा जावळे पाटील यांनी यावेळी दिला.संघटनेच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे सिडकोतील पवननगर येथील मैदानावर मराठा मित्र पुरस्कार व शिव-जिजाऊ पुरस्काराचे वितरण सोहळ्याप्रसंगी जावळे-पाटील बोलत होते.यावेळी व्यासपीठावर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भीमराव मराठे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे- पाटील, शिवा भागवत, महिला आघाडीच्या संगीता मुरकुटे, निवृत्ती दातीर, पवन मटाले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी संघटनेतर्फे मराठा मित्र पुरस्कार नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना प्रदान करण्यात आला तर नीलेश राणे, संगीता सोनवणे, दीपक चव्हाण, विलास जाधव, योगेश चुंभळे, डॉ. तुषार शिंदे, रवि पवार, संजय फटांगरे, रवींद्र दातीर, नितीन रोटे- पाटील, चंद्रकांत बनकर, दर्शन पाटील, बाळू गिते, मनीषा हिरे, संजीवनी जाधव आदींना शिव-जिजाऊ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. छावाचे शहराध्यक्ष योगेश गांगुर्डे यांनी प्रास्तविक केले. जिल्हाध्यक्ष आशिष हिरे यांनी स्वागत तर राजेश बेदमुथा यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :NashikनाशिकmarathaमराठाChhaava organization Washimछावा संघटना वाशिम