शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मेगा ब्लॉकमुळे अनेक रेल्वे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:20 IST

इगतपुरी रेल्वेस्थानकात विविध कामांकरिता रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे अनेक रेल्वे रद्द व काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

नाशिकरोड : इगतपुरी रेल्वेस्थानकात विविध कामांकरिता रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे अनेक रेल्वे रद्द व काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाकडून मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आलेल्या रेल्वे व इतर मार्गे वळविण्यात आलेल्या रेल्वे यांची माहिती ऐनवेळी जाहीर करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय व हाल होत आहेत.मध्य रेल्वेच्या कल्याण ते इगतपुरीपर्यंत तिसरा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, पुढील काम सुरू आहे. तसेच इगतपुरी रेल्वेस्थानकातील जुना पादचारी पूल तोडायचा असल्याने रेल्वे प्रशासनाकडून शुक्रवारपासून रविवारपर्यंत (१९ ते २१ एप्रिल) पॉवर ब्लॉक व मेगा ब्लॉक घेतला आहे.रविवारी रेल्वे गाड्या रद्दमेगा ब्लॉकमुळे रविवारी मुंबई-भुसावळ फास्ट पॅसेंजर, गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेस, भुसावळ-पुणे एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.रेल्वे मार्गात बदलमेगा ब्लॉकमुळे रविवारी एलटीटी- अलाहाबाद तुलसी एक्स्प्रेस, मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस या मुंबई, दिवा, वसई, जळगावमार्गे धावतील. तसेच रविवारची एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस ही कसारा रेल्वेस्थानकात सकाळी ८.३४ ते ११.१० पर्यंत थांबवून नंतर पुढे सोडली जाईल. एलटीटी-भागलपूर एक्स्प्रेस खर्डी रेल्वेस्थानकातून ९.४१ ते ११ वाजेपर्यंत, मुंबई-लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस आटगाव रेल्वेस्थानकातून सकाळी १० वाजेपासून १०.५८ पर्यंत थांबवून नंतर पुढे सोडली जाईल. तर मुंबई-नांदेड तपोवन छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी ६.१० ऐवजी सकाळी ९.५ वाजता, एलटीटी-कामाख्या एक्स्प्रेस एलटीटी येथून ७.५० ऐवजी ९ वाजता सुटेल. तसेच शनिवारी नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस ही नाशिकरोडलाच थांबवून रविवारी नाशिकरोडहूनच नागपूरला रवाना होणार आहे.प्रवाशांची गैरसोयउन्हाळ्याच्या सुट्टीमुळे रेल्वेला प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून, सुट्टीच्या काळात रेल्वे प्रशासनाकडून कामाकरिता मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आलेल्या गाड्या, रेल्वे मार्गात केलेले बदल याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाकडून ऐनवेळी जाहीर करण्यात आल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. रेल्वे प्रशासन मेगा ब्लॉक काळात रद्द होणाऱ्या गाड्या, मार्गात होणारे बदल याबाबत काही दिवस अगोदर माहिती देत नसल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेNashikनाशिक