शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारासाठी भाजपाकडे अनेक मुद्दे : श्याम जाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:28 IST

गेल्या साडेचार वर्षांत कधी नव्हे इतके मोठे काम मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पक्षाचा प्रचार करण्यासाठी भाजपाकडे अनेक मुद्दे असून, देशपातळीवर पक्षाची ताकद पाहता, येणाऱ्या निवडणुकीतही भाजपाच्या कुंडलीत सत्तेचा योग असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी केला.

ठळक मुद्देशक्ती केंद्रप्रमुखांच्या संमेलनात दावा

नाशिक : गेल्या साडेचार वर्षांत कधी नव्हे इतके मोठे काम मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पक्षाचा प्रचार करण्यासाठी भाजपाकडे अनेक मुद्दे असून, देशपातळीवर पक्षाची ताकद पाहता, येणाऱ्या निवडणुकीतही भाजपाच्या कुंडलीत सत्तेचा योग असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी केला.नाशिक, दिंडोरी, शिर्डी, अहमदनगर या चार लोकसभा मतदारसंघांतील शक्ती केंद्रप्रमुखांच्या संमेलनात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून गृहराज्यमंत्री राम शिंदे होते. नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात बोलताना जाजू पुढे म्हणाले, देशातील १७ राज्यांमध्ये भाजपा सत्तेत असून, लोकांचा जनाधार पक्षाला लाभला आहे आणि पक्षाची ताकदच गावोगावी उभी राहिलेली शक्ती केंद्रप्रमुख आहेत. कॉँग्रेसने गेल्या ५० वर्षांत कोणतेही काम न करता निव्वळ डंका पिटला, पण भाजपाने संपूर्ण जगातच भारताची नव्याने ओळख करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. राम शिंदे यांनी, विरोधकांकडून खोटे नाटे आरोप केले जात आहेत. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना जमिनीवर येऊन काम करावे लागणार असून शेवटच्या घटकापर्यंत पक्ष व सरकारने केलेले काम पोहोचविण्याची आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. खासदार दिलीप गांधी यांनीही यावेळी मार्गदर्शन करताना पक्षाचे कामच विजयाला हातभार लावेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आमदार रामदास आंबाडकर, प्रकाश मौले, मोहन चौधरी आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक लक्ष्मण सावजी यांनी केले. कार्यक्रमास महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, मोनिका राजोळे, सुनील बागुल, प्रथमेश गिते, दादा जाधव यांच्यासह चारही लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.खासदार अनुपस्थितभाजपाने नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील शक्तीप्रमुखांचे संमेलन भरविले असले तरी, नाशिकच्या जागेबाबत अद्याप भाजपाने ठोस दावा केलेला नाही. एकीकडे सेनेशी युतीची बोलणी सुरू असताना दुसरीकडे भाजपाने नाशिक लोकसभेसाठी शक्तीकेंद्र प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे या संमेलनाकडे दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पाठ फिरविली, तर पालकमंत्री गिरीश महाजन यांनीदेखील येण्याचे टाळले. दिवसभर संमेलन असल्याचे जाहीर करण्यात आले होते, मात्र प्रा. राम शिंदे यांनी अल्पवेळ हजेरी लावून काढता पाय घेतला, तर उपाध्यक्ष श्याम जाजू मार्गदर्शन करून निघून गेल्यावर व्यासपीठही सुनेसुने झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणBJPभाजपा