शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आज तब्बल ५९ नवे कोरोना रूग्ण; जुन्या नाशकात पुन्हा १९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 21:35 IST

जुन्या नाशकातील चौक मंडई येथील एका ७३वर्षीय कोरोनाबाधित वृध्दाचा रविवारी मृत्यू झाला.

ठळक मुद्देदाट लोकवस्तीमुळे या परिसरात कोरोनाचा धोका शहरात जुन्या नाशकात आतापर्यंत कोरोनाने सर्वाधिक मृत्यूशहराचा बाधितांचा आकडा हा ६७३

नाशिक : शहर व परिसरात रविवारी (दि.१४) तब्बल ५९ नवे कोरानाबाधित रूग्ण आढळून आले. शहराचा बाधितांचा आकडा हा ६७३ वर पोहचला आहे. जुन्या नाशकात आज पुन्हा नवे १९ रूग्ण आढळून आले. वडाळागावात मागील आठवडाभरापासून नवीन रूग्ण आढळून येत नव्हते; मात्र रविवारी पुन्हा वडाळागावात तीन नवे रूग्ण पॉसिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात रविवारी एकूण ९२ रुग्ण आढळून आले. ग्रामिण भागातील ३३ रूग्णांचा यामध्ये समावेश आहे. नाशिक महापालिका हद्दीतील जुन्या नाशकातील चौक मंडई येथील एका ७३वर्षीय कोरोनाबाधित वृध्दाचा रविवारी मृत्यू झाला. महापालिका हद्दीत आतापर्यंत एकूण ३२ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. २३२ रुग्ण उपचारादरम्यान ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या उपचारार्थ ४०९ रुग्ण दाखल आहेत.कोरोनाबाधित रूग्णांची संख्या शहर व परिसरात झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे आता महापालिका, पोलीस प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकीकडे ‘अनलॉक’ करण्यात येत असताना दुसरीकडे मात्र कोरोनाचे संक्रमण ‘लॉक’ होण्याचे नावच घेत नसल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. सध्याच्या घडीला महापालिका प्रशासनाची पंचवटीमधील पेठरोड, जुने नाशिक आणि वडाळागाव ही मोठी डोकेदुखी ठरत आहेत. या भागात कोरोनाबाधितांची संख्या अद्यापही नियंत्रणात येत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जुने नाशिककरांनी पुढे येत सोशलमिडियावरून सोमवारपासून पुढील तीन दिवस स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याबाबतचे आवाहन करणारा लघुसंदेश व्हायरल केला आहे; मात्र या आवाहनला परिसरातील रहिवाशांकडून कितपत प्रतिसाद मिळतो, ते सोमवारी स्पष्ट होईल. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी जुने नाशिककरांचा ‘जनता कर्फ्यू’ हा खूपच आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. या अनुषंगाने सोशलमिडियावर रविवारी सकाळपासूनच एक जनजागृतीपर आवाहन करणारा लघुसंदेश फिरत होता. कारण आतापर्यंत कोरोनाने सर्वाधिक मृत्यू शहरात जुन्या नाशकात झाले आहे. त्यामुळे जुने नाशिक भागातील वाढता कोरोनाचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी महपाालिका प्रशासनासोबत नागरिकांनाही तितकेच प्रयत्न करावे लागणार आहे. तसेच पेठरोडवरील पंचवटी भागातील नागरिकांनीसुध्दा संक्रमण टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला पाहिजे, असे वैद्यकिय सुत्रांचे म्हणणे आहे. पंचवटी, पेठरोड, जुने नाशिक, वडाळागाव हा सगळा गावठाणचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील जीवनशैली, दाट लोकवस्ती यामुळे या परिसरात कोरोनाचा धोका अधिक वाढत आहे.शहरात आज नव्याने जुने नाशिकमधील नाईकवडीपुरा, कथडा, बागवानपुरा, हमालपुरा, फाळके २ोड, खडकाळी, आझाद चौक, वडाळानाका या भागातील मिळून १९ रूग्ण मिळाले. यामध्ये वडाळानाका येथे सर्वाधिक ७ रूग्ण आहेत. तसेच वडाळागाव-३, वडाळारोड-१, भाभानगर-१, भारतनगर-१ पखालरोड-४, पेठरोड- ५, पाथर्डीफाटा-१, गंगापूररोड-१, कामटवाडे-१, हिरावाडी- ४, पेठकर प्लाझा, पंचवटी-१, मखमलाबादरोड-१, सातपूर-१, शिवाजीनगर-१, बिटको कॉलेज परिसर-१, त्रिमुर्तीनगर- ३, पोलीस मुख्यालय वसाहत-३, उत्तमनगर-१, नाशिकरोड-१, लॅमरोड-१, गोसावीनगर-१ असे रूग्ण आढळून आले आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका