शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दंगल, जाळपोळप्रकरणी मानूरचे १० युवक निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 18:13 IST

न्यायालयाचा निकाल : तीन वर्षांपूर्वीची घटना

ठळक मुद्देटेम्पोला आग लावून दहशत निर्माण केली म्हणून कळवण पोलिसांनी मानूर येथील १० युवकांवर गुन्हा दाखल केला होता

कळवण : येथील बेहडी पुलाजवळ परिसरातील १५० ते २०० युवकांच्या जमावाने अपघातास कारणीभूत ठरलेल्या टेम्पोला अडवून त्याला आग लावून तेथे दहशत निर्माण करणे, जमावाला नियंत्रणात आणणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणे, शासकीय कामकाजात हस्तक्षेप, जाळपोळ करणे या आरोपांतून मानूर येथील १० युवकांची सबळ पुराव्याअभावी कळवण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.तीन वर्षापूर्वी मानूर येथील पाटबंधारे विभागाच्या शासकीय विश्रामगृहासमोर झालेल्या टेम्पो व मोटारसायकल अपघातात मानूर येथील जगदीश पाटील या २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी घटनास्थळावरून टेम्पो चालक शरद डुकरे याने कळवणच्या दिशेने पळ काढल्याने शहराजवळील बेहडी नदीपुलाजवळ त्याला मारहाण करण्याच्या उद्देशाने जमावाने टेम्पो अडवला. टेम्पोला आग लावून दहशत निर्माण केली म्हणून कळवण पोलिसांनी मानूर येथील १० युवकांवर गुन्हा दाखल केला होता. कळवण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती स्वरा पारखी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी होऊन या दहाही युवकांची कळवण पोलिसांनी दाखल केलेल्या दोन्ही प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. 

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय