शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
2
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
3
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
4
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
5
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
6
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
7
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
8
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
9
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...
10
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
11
Lok Sabha Elections 2024 : भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर!
12
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
13
भाजपा नेते सूरज पाल अम्मू यांचा राजीनामा, पत्राद्वारे सांगितलं कारण....
14
दिवसभर केलं शूट, इंटिमेट सीननंतर झाल्या वेदना; 'हीरामंडी' फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख
15
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
16
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
17
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
18
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
19
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
20
Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस

देवगाव परिसरात कोंबड्यांवर मानमोडीचा रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 11:58 PM

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक त्रस्त असताना आता कोंबड्यांवर संकट उभे ठाकले असून, कोंबड्यांतील मानमोडी ...

ठळक मुद्देकाही कोंबड्या दगावल्या : उष्णतेच्या अधिक तीव्रतेमुळे प्रादुर्भाव

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक त्रस्त असताना आता कोंबड्यांवर संकट उभे ठाकले असून, कोंबड्यांतील मानमोडी रोगाच्या प्रादुर्भावाने सात ते आठ कोंबड्या दगावल्या आहेत. उष्णतेच्या अधिक तीव्रतेमुळे हा प्रादुर्भाव वाढला असून, मानमोडी संसर्गजन्य रोग असल्यामुळे इतरही कोंबड्यांना त्याची बाधा झाल्याचे दिसून येत आहे.वाढत्या उष्णतेच्या तीव्रतेने व कॅल्शिअम, फॉस्फरस आणि "ड' जीवनसत्त्व यांची कमतरता किंवा असंतुलितता, चुकीचे खाद्य मिश्रण, आणि इतर काही आजार ज्यामध्ये हाडांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि "ड' जीवनसत्त्व यांच्यावर होणारा परिणाम आदी कारणांनी मानमोडी रोगाचा परिणाम कोंबड्यांवर दिसून येतो. तसेच चांगली शरीरयष्टी असणाऱ्या व जास्त अंडी देणाऱ्या कोंबड्यांत या आजाराचे प्रमाण जास्त आढळते. त्यामुळे अंड्यांचे उत्पादन अचानक कमी होते. मरतुकीचे प्रमाण हे २ ते १० टक्के एवढे असते. उष्ण हवामान, तणाव यामध्ये मरतुकीचे प्रमाण वाढते. या आजाराची बाधा झालेल्या कोंबड्यामध्ये झुंगण्याचे प्रमाण वाढून शेवटी कोंबड्या मृत पावतात.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात कोरोना महामारीचा फैलाव मोठ्या प्रमाणात फोफावत असताना कोंबड्यावरही मानमोडी महामारीचे संकट ओढावले असून, सात ते आठ कोंबड्या या रोगाला बळी पडल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून याबत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली.तापमानातील वाढलेल्या उष्णतेचा कोंबड्यावर परिणाम होत असून चुकीचे खाद्य मिश्रणाने कोंबड्यावरील मानमोडी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबाबत तत्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना करून रोगराई नियंत्रणात आणली जाईल.- डॉ. विजय भोये, पशुधन अधिकारी, देवगावफोटो - ०४ देवगाव बर्डदेवगावमध्ये मृत पावलेल्या कोंबड्या.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूHealthआरोग्य